न्यूझीलंडच्या होली हडलस्टन हिने महिला सुपर स्मॅशमध्ये पकडलेला एक हाती कॅच पाहून क्रिस जॉर्डन ने पकडलेला झेल नक्कीच विसराल, पाहा Video

पण, चेंडू हवे राहिला आणिहडलस्टनने उजव्या बाजूला हवेत उडी मारत एका हातात झेल पकडला.

होली हडलस्टन (Photo Credit: Twitter/AucklandCricket)

पर्थ स्क्रॉचरचा अष्टपैलू क्रिस जॉर्डन (Chris Jordan) याने शनिवारी मेलबर्न रेनेगेड्सविरूद्ध बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) खळबळजनक कॅच पकडला. हा झेल इतका शानदार आणि अविश्वसनीय होता की अगदी जॉर्डनलाही त्यावर एकदाच विश्वास ठेवला नाही. या झेल नंतर त्याची प्रतिक्रिया देखण्यासारखी होती. पण, न्यूझीलंडमध्ये सध्या सुरु असलेल्या महिला सुपर स्मॅश (Women's Super Smash) लीगमध्ये एक आश्चर्यकारक झेल पकडला जो पाहून तुम्हीही जॉर्डनने पकडलेला झेल विसरून जाल. नॉर्दन स्पिरिटची (Northern Spirit) फलंदाज केटी गुर्रे (Katie Gurray) हिला बाद करण्यासाठी ऑकलंड हार्ट्सची (Auckland Hearts) गोलंदाज आर्लेन केली हिने टाकलेल्या शॉर्ट बॉलवर केटीने चौकार मारण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू हवे राहिला आणि होली हडलस्टनने (Holly Huddleston) उजव्या बाजूला हवेत उडी मारत एका हातात झेल पकडला. हडलस्टनने पकडलेला हा कॅच इतका शानदार होता की याची जॉर्डनने बिग बॅश लीगमध्ये नुकत्याच पकडलेल्या झेलशी तुलना होत आहे. शिवाय, काही तर याला जॉर्डनच्या कॅचपेक्षाही प्रभावी मानत आहे.

जॉर्डनच्या कॅचबद्दल बोलायचे झाले तर, मेलबर्न रेनेगेडसच्या डावाच्या 18 व्या षटकात फवाद अहमदने डेन ख्रिश्चनला हाल्फ वॉकि चेंडू टाकला. त्याने लॉन्ग ऑनवर मोठा शॉट खेळला, पण जॉर्डनने पळत येत कॅच पकडला आणि खाली पडला. दुसरीकडे हडलस्टनबद्दल बोलले तर, तिने पकडलेला हा कॅच महिला क्रिकेटपटूने पकडलेला सर्वोत्तम कॅचपैकी एक आहे. हरमनप्रीत कौरपासून सारा टेलर पर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूंनी आश्चर्यकारक झेल पकडले आहेत. तुम्हीही पाहा हडलस्टनचा हा कॅच:

नॉर्दन स्पिरिटने टॉस जिंकून पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. याच्या प्रत्युत्तरात ऑकलंड हार्ट्सने 20 ओव्हरमध्ये 167 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करत स्पिरिट्स संघाला निर्धारित ओव्हरमध्ये 136 धावाच करता आल्या.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif