ND vs ENG: मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल, गंभीरचा 'शिष्य' संघात दाखल

भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होणार आहे. या मालिकेच्या सुरुवातीपूर्वीच टीम इंडियाच्या संघात एक बदल दिसून आला आहे.

ND vs ENG: मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल, गंभीरचा 'शिष्य' संघात दाखल
Gautam Gambhir (Photo Credit - X)

India vs England Test Series: भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. पहिला सामना 20 जून रोजी लीड्समध्ये खेळला जाईल. यावेळी टीम इंडियाची कमान शुभमन गिलच्या हाती आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ज्यामुळे युवा संघाची इंग्लंडमध्ये मोठी परीक्षा होणार आहे. मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या संघात एक बदल झाला आहे. हर्षित राणाची टीम इंडियामध्ये एन्ट्री झाली आहे. इंग्लंड दौऱ्यावर हा वेगवान गोलंदाज इंडिया अ संघाचा भाग होता.

हर्षित राणाला टीम इंडियाच्या 18 सदस्यीय संघात समाविष्ट करण्यात आले नव्हते. परंतु आता हर्षितला कसोटी मालिकेसाठी टीम इंडियामध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे वृत्त येत आहे. दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, हर्षित राणाला टीम इंडियाच्या संघात समाविष्ट करण्यात आले आहे. संघात सामने खेळून खेळाडू भारतात परतत असताना, हर्षितला इंग्लंडमध्ये राहण्यास सांगण्यात आले. लीड्समध्ये वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते, ज्यामुळे टीम इंडिया एका अतिरिक्त वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरू शकते.

टीम इंडियाच्या संघात 5 वेगवान गोलंदाजांचा समावेश

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या 18 सदस्यीय संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग आणि आकाशदीपसह 5 वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. याशिवाय, हर्षित राणाला आता सहावा गोलंदाज म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. वृत्तानुसार, या मालिकेतील सर्व 5 सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराह खेळेल की नाही याबद्दल अजूनही सस्पेन्स आहे.

ऑस्ट्रेलियाच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दौऱ्यादरम्यान हर्षित राणाला टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. या दौऱ्यावर, हर्षितने 2 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्याने गोलंदाजी करताना 2 विकेट घेतले.

(The above story first appeared on LatestLY on Jun 17, 2025 01:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).