Hardik Pandya: हार्दिक पंड्याने सोडले मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद; पंजाबविरोधात पराभव जिव्हारी लागला

अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल 2025 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. या रोमांचक सामन्यात पंजाबने मुंबईचे 204 धावांचे लक्ष्य 5 विकेट्सने साध्य केले.

Hardik Pandya: हार्दिक पंड्याने सोडले मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद; पंजाबविरोधात पराभव जिव्हारी लागला
Hardik Pandya (Photo Credit: X)

Hardik Pandya: कर्णधार हार्दिक पंड्या याने मुंबई इंडियन्सला आयपीएल 2025 मध्ये क्वालिफायर-2 पर्यंत आणलं. मात्र हार्दिक मुंबईला अंतिम फेरीत पोहचवण्यात अपयशी ठरला. पराभवामुळे हार्दिकला अश्रू अनावर झाले. मैदानात सर्वच खेळाडू निराशेच्या छायेत दिसत होते. त्यानंतर आता हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद सोडल्याचे समोर येत आहे. टाटा आयपीएल कोमेन्ट्री या एक्स अकाऊंटवरून ही माहीत जाहीर करण्यात आली आहे. पंजाब (Punjab Kings) विरोधात पराभव जिव्हारी लागल्याचे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होते. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये कालचा सामना पार पडला. ज्यात मुंबईचे सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंग झाले.

मुंबईच्या फलंदाजांनी धावा करत 204 चे आव्हान पंजाबला दिले होते. मात्र, गोलंदाज काहीसे कमी पडले. मुंबईने आयपीएलमध्ये जेव्हा 200 पेक्षा अधिक धावा केल्या तेव्हा तेव्हा त्यांचा विजय झाला होता. त्यामुळे मुंबई हा सामनाही जिंकेल, अशी आशा पलटणच्या चाहत्यांना होती. मात्र मुंबईचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. तसेच गोलंदाजांना फिल्डिंगमधूनही अपेक्षित साथ मिळाली नाही. ट्रेंट बोल्ट याने निर्णायक क्षणी नेहल वढेरा याची सोपी कॅच सोडली. मुंबईने मोठी संधी गमावली. बोल्टने कॅच सोडणं हा टर्निंग पॉइंट ठरला.

दुसरी मोठी बाब म्हणजे जसप्रीत बुमराह कालच्या सामन्यात अपयशी ठरला. बुमराह ला मुंबईचा तारणहार असे ही म्हटले जाते. त्याने अनेक संघाला एकहाती विजय मिळवून दिला आहे. मात्र या सामन्यात बुमराहला चांगली कामगिरी करता आली नाही. बुमराहला एकही विकेट मिळवता आली नाही.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).