Harbhajan Singh on IND vs ENG: हरभजन सिंगची प्लेइंग 11 मध्ये बदलाची मागणी; संघात 'हा' गोलंदाजाला जागा देण्याचा सल्ला
हेडिंग्ले येथील पराभवानंतर हरभजन सिंगने टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल करण्याची मागणी केली आहे.
Harbhajan Singh IND vs ENG: हेडिंग्ले येथील पराभवानंतर टीम इंडियाला (Team India) इंग्लंडकडून 5 विकेट्सने पराभव स्वीकारावा (IND vs ENG)लागला. चौथ्या डावात भारतीय गोलंदाज प्रत्येक विकेटसाठी तत्पर असल्याचे दिसून आले. बेन डकेट आणि जॅक क्रॉलीच्या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला जवळजवळ सामन्यातून बाहेर काढले. डकेटने 149 धावांची दमदार खेळी केली. पराभवानंतर संघाच्या कामगिरीवर जोरदार टीका होत आहे. दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग 11 मध्ये बदल करण्याची मागणी माजी भारतीय फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने (Harbhajan Singh) केली आहे.
प्लेइंग 11 मध्ये बदल गरजेचा
हेडिंग्लेमधील पराभवानंतर हरभजन सिंगने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना, "टीम इंडियावर आता दबाव असेल, 0-1 ने पिछाडीवर राहिल्यानंतर संघाला धडा घ्यावा लागेल. माझ्या मते, कुलदीप यादवला पुढच्या सामन्यात संधी मिळायला हवी. जर तो प्लेइंग 11 मध्ये आला तर टीम इंडियाकडे विकेट घेण्याचे अधिक पर्याय असतील. पण प्रश्न असा आहे की, कुलदीप कोणाची जागा घेईल? शार्दुल ठाकूर? मी म्हटले होते की शार्दुलने जास्त गोलंदाजी करावी, पण इंग्लंडला जिंकण्यासाठी फक्त 100-120 धावांची आवश्यकता असताना त्याला गोलंदाजी करायला आणण्यात आले. त्याला पुरेशा संधी मिळायला हव्यात. जर तुम्हाला शार्दुलला थोडासा गोलंदाजी करू शकणाऱ्या फलंदाज म्हणून खेळवायचे असेल तर ते चुकीचे आहे. तो फलंदाजी करू शकणारा गोलंदाज आहे."
हरभजन पुढे म्हणाला की, "पुढची कसोटी सामन्यात ही सुधारणा व्हायला हवी. हा इंग्लंडचा दौरा आहे. अनेक बलाढ्य संघ तेथे जिंकण्यात अपयशी ठरले आहेत. जर संघ 471 धावा खेळला आणि विकेट घेण्यात आपयशी ठरला तर आपण ही संधी गमावली आहे." हे 148 वर्षांत पहिल्यांदाच घडले, दोन्ही डावांमध्ये भारतीय फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी दाखवली. परंतु हेडिंग्ले येथे गोलंदाजांनी त्यांना नामुष्की आणण्यात कोणतीही कसर सोडली नाही. 19 षटके टाकूनही बुमराहला एकही विकेट घेता आली नाही. त्याच वेळी, सिराजची बॅगही रिकामी राहिली. कसोटी क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच फलंदाजांनी पाच शतके झळकावूनही एखाद्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा लज्जास्पद विक्रम आता टीम इंडियाच्या नावावर नोंदला गेला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 25, 2025 03:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

