GT vs MI Eliminator IPL 2025 Live Streaming : मुंबई की गुजरात कोण गाजवले वर्चस्व? आजच्या सामन्याकडे सगळ्याचे लक्ष; पहा लाईव्ह सामना कसा आणि कुठे पहाल

आयपीएल 2025 स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहचली आहे. क्वालिफायर, एलिमिनेटर सामन्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातही आजची सामना सगळ्यात जास्त रोमांचक असणार आहे. कारण मुंबईचा सामना गुजरातसोबत होत आहे.

GT vs MI Eliminator IPL 2025 Live Streaming : मुंबई की गुजरात कोण गाजवले वर्चस्व? आजच्या सामन्याकडे सगळ्याचे लक्ष; पहा लाईव्ह सामना कसा आणि कुठे पहाल
Photo Credit- X

Gujarat Titans vs Mumbai Indians, Eliminator, IPL 2025 Match: अडखळत्या सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्सने (GT vs MI) पराभव पाहिला नाही. एकीकडे दमदार पुनरागमनाने गेल्या काही सामन्यांत लय राखलेला मुंबई आहे तर, सध्या अडखळत असलेला गुजरात टायटन्स हा संघ आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) क्रिकेटमध्ये आज, शुक्रवारी ‘एलिमिनेटर’च्या सामन्यात दोन्ही एकमेकांसमोर येणार आहे. मुंबईने आत्तापर्यंत पाच जेतेपद जिंकली आहेत. त्यामुळे आव्हान पेलण्याचा त्यांचा अनुभव असून गुजरात संघाने एकदाच ‘आयपीएल’ करंडक उंचावला आहे. त्याशिवाय मुंबई संघात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कर्णधार हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमरा सारख्ये अनुभवी खेळाडूंचाही समावेश आहे. या अनुभवी खेळाडूंची ताकज मुंबईसाठी नक्कीच फायद्याची ठरणार आहे.

दुसरीकडे कर्णधार म्हणून शुभमन गिल मुंबईचे हे दडपण कसे हाताळतो याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. गुजरात संघाने यंदाच्या हंगामाची दमदार सुरुवात केली. त्या जोरावर गुणतालिकेत अग्रस्थान गाठले. ‘अव्वल दोन’ स्थानांवरील संघांना अंतिम फेरी गाठण्याची दोन वेळा संधी मिळाली. मात्र, गुजरात संघाने मोक्याच्या क्षणी निराशा केली. अखेरच्या दोन साखळी सामन्यांत पराभव पत्करावा लागल्याने गुजरातची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. त्यामुळे त्यांना आता ‘एलिमिनेटर’च्या सामन्यात खेळावे लागणार आहे.

मुंबई आणि गुजरात यांच्यातील आयपीएल 2025 चा एलिमिनेटर सामना कधी खेळला जाईल?

दोन्ही संघांमधील हा सामना आज शुक्रवारी, 30 मे 2025 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल.

मुंबई आणि गुजरात यांच्यातील आयपीएल 2025 चा एलिमिनेटर सामना कुठे खेळला जाईल?

दोन्ही संघांमधील हा सामना नवीन चंदीगड येथील मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

दोन्ही संघाचे खेळाडू

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो, सूर्यकुमार यादव, चरित असलंका, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, अश्वनी कुमार/कर्ण शर्मा

गुजरात टायटन्स: साई सुधारसन, शुबमन गिल, कुसल मेंडिस, शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, जेराल्ड कोएत्झी, अर्शद खान, आर साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा

(The above story first appeared on LatestLY on May 30, 2025 08:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).