Fake VIVO IPL 2020 Schedule in PDF Goes Viral: BCCI ने आयपीएल 13 चे वेळापत्रक केले जारी? पहा व्हायरल पोस्ट मागील सत्य
प्राप्त माहितीनुसार हे वेळापत्रक अधिकृत नसून अद्याप तरी बीसीसीआय कडून वेळापत्रकाविषयी माहिती देण्यात आलेली नाही असे सांगण्यात येतेय
VIVO IPL 2020 Schedule in PDF: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) स्पर्धेच्या 2020 साठीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. BCCI अध्यक्ष ब्रिजेश पटेल (Brijesh Patel) यांनी यंदा आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत (United Arab Emirates) 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा खेळली जाईल असे सांगितले आहे. या घोषणेनंतर Whatsapp सह सोशल मीडिया वर आयपीएल चे वेळापत्रक एका पीडीएफ च्या स्वरूपात व्हायरल होत आहे. प्राप्त माहितीनुसार हे वेळापत्रक अधिकृत नसून अद्याप तरी बीसीसीआय कडून वेळापत्रकाविषयी माहिती देण्यात आलेली नाही असे सांगण्यात येतेय. तुमच्या फोनवर सुद्धा असे पीडीएफ आल्यास यावर विश्वास ठेवू नका असे स्पष्ट करण्यात आले आहे. काय आहे ही व्हायरल पोस्ट आणि काय आहे त्यामागील सत्य सविस्तर पाहुयात..
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आयपीएल च्या वेळापत्रकात बीसीसीआय ने जाहीर केलेल्या कालखंडात मॅच च्या तारखा सांगण्यात आल्या आहेत, संपूर्ण 51 दिवसांचे हे वेळापत्रक आहे. या खोट्या पीडीएफ मध्ये म्हण्टल्यानुसार रोज 4 ते 8 या वेळेत सामने खेळवले जातील असे सांगण्यात आले आहे मात्र बीसीसीआय च्या माहितीन्वये भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 ते 7.30 या वेळेत सामने खेळवले जाणार आहेत. हे खोटे पीडीएफ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
Fake VIVO IPL 2020 Schedule in PDF Post
दरम्यान, UAE मध्ये आयपीएल आयोजित केले जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकांच्या काळात आयपीएलच्या तारखा येत असल्याने सुरुवातीचे काही सामने दुबई मध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळेस सुद्धा युएईत दुबई, अबू धाबी आणि शारजाह येथे सामने खेळले जाण्याची शक्यता आहे