
England National Cricket Team vs West Indies Cricket Team, 3rd ODI Match 2025 Pitch Update: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना उद्या म्हणजे 3 जून रोजी खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.30 वाजता लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे खेळला जाईल. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजचा तीन विकेट्सने पराभव केला. यासह, इंग्लंडने मालिकेत 2 अशी निर्विवाद आघाडी घेतली आहे. आता तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड मालिका क्लिन स्वीप करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
केनिंग्टन ओव्हल पिच रिपोर्ट
इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना उद्या म्हणजे 3 जून रोजी लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे खेळला जाईल. केनिंग्टन ओव्हलची खेळपट्टी फलंदाजांना खूप मदतशीर ठरते. सामन्याच्या सुरुवातीला, वेगवान गोलंदाजांना काही स्विंग आणि बाउन्स मिळू शकतात. नवीन चेंडू असलेल्या गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची असेल. खेळ जसजसा पुढे सरकतो तसतसे खेळपट्टी मंदावते आणि नंतर फिरकीपटूंना वळण येऊ लागते. विशेषतः दुसऱ्या डावात फलंदाजांसाठी धावा काढणे आव्हानात्मक असू शकते. या मैदानावर पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या सुमारे 233 धावा आहे, तर दुसऱ्या डावात संघांनी सुमारे 188 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देईल.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन
इंग्लंड: बेन डकेट, विल जॅक्स, टॉम बॅंटन, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), जेकब बेथेल, जेमीस ओव्हरटन, ब्रायडन कार्स, आदिल रशीद, साकिब महमूद, मॅथ्यू पॉट्स.
वेस्ट इंडिज: ब्रँडन किंग, एविन लुईस, कीसी कार्टी, शाई होप (कर्णधार आणि यष्टीरक्षक), आमिर जांगू, जस्टिन ग्रीव्हज, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स.