England vs Australia 4th ODI 2024 1st Inning Scorecard: हॅरी ब्रुकची 58 चेंडूत 87 धावांची शानदार खेळी, इंग्लंडचे ऑस्ट्रेलियासमोर 313 धावांचे आव्हान
पावसामुळे टॉसला उशीर झाला आणि षटकेही कमी झाली.
England National Cricket Team vs Australia National Cricket Team 4th ODI Match Scorecard: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील (ODI Series) चौथा सामना आज म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील लॉर्ड्सवर खेळला जात आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड संघाने शानदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाचा 46 धावांनी पराभव केला. सध्या ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता चौथा सामना जिंकून इंग्लंडच्या नजरा मालिकेत 2-2 अशी बरोबरी करण्यावर आहेत. (हेही वाचा - England vs Australia 4th ODI 2024 Toss Delayed Due To Rain: लॉर्ड्सवर पावसामुळे टॉसला उशीर, इंग्लंडसाठी 'करा या मरो'चा सामना)
लॉर्ड्सवर खेळल्या जात असलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे टॉसला उशीर झाला आणि षटकेही कमी झाली. चौथा एकदिवसीय सामना 39-39 षटकांचा असेल. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडच्या संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी झटपट पहिल्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली.
इंग्लंड संघाने 39 षटकांत 5 गडी गमावून 312 धावा केल्या. इंग्लंडकडून कर्णधार हॅरी ब्रूकने सर्वाधिक 87 धावांची खेळी खेळली. या खेळीदरम्यान त्याने 58 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकार लगावला. हॅरी ब्रूकशिवाय बेन डकेटने 63 धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये लियाम लिव्हिंगस्टोनने शानदार फलंदाजी केली आणि अवघ्या 27 चेंडूत तीन चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 62 धावांची खेळी केली.
पाहा पोस्ट -
जोश हेजलवूडने फिलिप सॉल्टच्या रूपाने ऑस्ट्रेलियन संघाला पहिले यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाकडून ॲडम झाम्पाने सर्वाधिक दोन बळी घेतले. ॲडम झाम्पाशिवाय जोश हेझलवूड, मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाला 39 षटकात 313 धावा करायच्या आहेत. इंग्लंड संघाला हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे. तर ऑस्ट्रेलियाही हा सामना जिंकून मालिका जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.