England vs Australia 2nd ODI 1st Inning Live Scorecard: इंग्लंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 270 धावांवर रोखले, ॲलेक्स कॅरीने 74 धावांची खेळली खेळी

ऑस्ट्रेलियाकडून ॲलेक्स कॅरीने 74 धावांची शानदार खेळी केली. आपल्या उत्कृष्ट खेळीदरम्यान ॲलेक्स कॅरीने आठ चौकार आणि तीन षटकार ठोकले.

पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिका 2024 (ODI मालिका 2024) चा दुसरा सामना आज म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी लिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळला जात आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंड संघ दुसऱ्या वनडेत पुनरागमन करू इच्छितो. (हेही वाचा  -   ENG vs AUS 2nd ODI Live Toss Update: दुसऱ्या वनडेत नाणेफेचा कौल इंग्लडच्या बाजुने, ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी केले आमंत्रित )

दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि सलामीवीर ट्रॅव्हिस हेड अवघ्या 29 धावा करून ब्रेडन कार्सला बळी पडला. यानंतर मिचेल मार्श आणि स्टीव्हन स्मिथने डावाची धुरा सांभाळली.

पाहा पोस्ट -

संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ 44.4 षटकात केवळ 270 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून ॲलेक्स कॅरीने 74 धावांची शानदार खेळी केली. आपल्या उत्कृष्ट खेळीदरम्यान ॲलेक्स कॅरीने आठ चौकार आणि तीन षटकार ठोकले. ॲलेक्स कॅरीशिवाय कर्णधार मिचेल मार्शने 60 धावा केल्या.

ब्राइडन कारसेने इंग्लंड संघाला पहिले यश मिळवून दिले. इंग्लंडकडून ब्रेडन कार्सने सर्वाधिक तीन बळी घेतले. ब्रेडन कार्सेशिवाय आदिल रशीद, मॅथ्यू पॉट्स आणि जेकब बेथेलने प्रत्येकी दोन गडी बाद केले. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंड संघाला 50 षटकात 271 धावा करायच्या आहेत. इंग्लंड संघाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे.

ऑस्ट्रेलियाची फलंदाजी: 270/10 (44.4 षटके) (मॅथ्यू शॉर्ट 29 धावा, ट्रॅव्हिस हेड 29 धावा, मिचेल मार्श 60 धावा, स्टीव्हन स्मिथ 4 धावा, मार्नस लॅबुशेन 19 धावा, ॲलेक्स कॅरी 74 धावा, ग्लेन मॅक्सवेल 7 धावा, आरोन हार्डी 3 धावा) , मिचेल स्टार्क 0 धावा, ॲडम झाम्पा 3 धावा, जोश हेझलवूड नाबाद 4 धावा).

इंग्लंडची गोलंदाजी: (ब्रेडन कार्स 75/3, आदिल रशीद 42/2, जेकब बेथेल 33/2, मॅथ्यू पॉट्स 30/2, ऑली स्टोन 46/1).