England vs West Indies, 2nd ODI Match Live Streaming In India: वेस्ट इंडिजला हरवून मालिका जिंकण्याचा इंग्लंडचा प्रयत्न;जाणून घ्या थेट सामना कधी, कुठे आणि कसा आनंद पहाल

जोस बटलरने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर हॅरी ब्रूकची नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडच्या खराब कामगिरीनंतर बटलरने कर्णधारपद सोडले.

England vs West Indies, 2nd ODI Match Live Streaming In India: वेस्ट इंडिजला हरवून मालिका जिंकण्याचा इंग्लंडचा प्रयत्न;जाणून घ्या थेट सामना कधी, कुठे आणि कसा आनंद पहाल
Photo Credit- X

England National Cricket Team vs West Indies Cricket Team, 2nd ODI Match Live Streaming In India: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज क्रिकेट संघ (ENG vs WI) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजे 1 जून रोजी खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता कार्डिफमधील सोफिया गार्डन्स येथे खेळला जाईल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजचा 238 धावांनी पराभव केला. यासह, इंग्लंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड मालिका जिंकण्याच्या इराद्याने खेळेल. तर, वेस्ट इंडिज मालिकेत पुनरागमन करू इच्छित असेल. चॅम्पियन ट्रॉफीनंतर इंग्लंडने त्यांचा पहिला एकदिवसीय सामना खेळला. हॅरी ब्रूकची कारकिर्द तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेने सुरू होईल. हॅरी ब्रूकला व्हाईट बॉल क्रिकेट संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या मालिकेत इंग्लंडचे नेतृत्व हॅरी ब्रूक करत आहेत. तर वेस्ट इंडिजचे नेतृत्व शाई होप करत आहेत.

पहिल्या एकदिवसीय सामन्याची स्थिती

पहिल्या एकदिवसीय सामन्यात, वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडन प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरले आणि निर्धारित 50 षटकांत आठ गडी गमावून 400 धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजला 50 षटकांत 401 धावा करायच्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला संपूर्ण वेस्ट इंडिज संघ 26.2 षटकांत फक्त 162 धावांवर आटोपला.

या एकदिवसीय मालिकेनंतर, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाईल. या टी-20 मालिकेतील पहिला सामना 6 जून रोजी खेळला जाईल, तर दुसरा टी-20 सामना 8 जून रोजी खेळला जाईल. तर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना 10 जून रोजी खेळला जाईल. जोस बटलरने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर हॅरी ब्रूकची नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?

इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज म्हणजेच 1 जून रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.30 वाजता कार्डिफमधील सोफिया गार्डन्स येथे खेळला जाईल.

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे भारतात थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील भारतात होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांचे प्रसारण अधिकार सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. अशा परिस्थितीत, इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिजच्या सर्व एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स टीव्ही चॅनेलवर केले जाईल. प्रेक्षक हे सामने त्यांच्या टीव्ही सेटवर सोनी स्पोर्ट्स टेन 1, सोनी स्पोर्ट्स टेन 3 आणि सोनी स्पोर्ट्स टेन 5 चॅनेलवर पाहू शकतात.

दोन्ही संघांचे खेळाडू

इंग्लंड: बेन डकेट, विल जॅक्स, टॉम बॅंटन/जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), जेकब बेथेल, जेमीस ओव्हरटन, ब्रायडन कार्स, आदिल रशीद, साकिब महमूद, मॅथ्यू पॉट्स.

वेस्ट इंडिज: ब्रँडन किंग, एविन लुईस, केसी कार्टी, शाई होप (कर्णधार आणि यष्टीरक्षक), आमिर जांगू, जस्टिन ग्रीव्हज, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).