'मी येतोय'! जसप्रीत बुमराह याने दिले पुनरागमनाचे संकेत; सोशल मीडियावर शेअर केलेल्या 'या' फोटोवर इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूने दिली अशी प्रतिक्रिया

बुमराहने दुखापतीतून पुनरागमन करण्याचा जोरदार प्रयत्न करीत आहे आणि याची एक झलक म्हणून त्याने जिममधील वर्कआऊट करतानाचा फोटो शेअर केला. बुमराहच्या या फोटोवर इंग्लंडची स्टार महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅटच्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले. 

जसप्रीत बुमराह, डॅनियल वॅट (Photo Credit: Instagram/Getty)

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Team) यॉर्कर एक्स्पर्ट जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सध्या त्याच्या पाठीच्या दुखापतीतून सावरत आहे. बुमराहला वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान पाठीला दुखापत झाली होती, पण ती काही वेळानंतर आढळून आली. यामुळे, बुमराहला दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टेस्ट मालिकेसाठी भारतीय संघातून बाहेर राहावे लागले होते. आणि शिवाय त्याचा आता बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध टेस्ट मालिकेसाठी संघात समावेश नाही झाला आहे. पण, आता बुमराहने सोशल मीडियावर फोटो शेअर करून लवकरच पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहे. बुमराहने दुखापतीतून पुनरागमन करण्याचा जोरदार प्रयत्न करीत आहे आणि याची एक झलक म्हणून त्याने जिममधील वर्कआऊट करतानाचा फोटो शेअर केला. बुमराहने फोटो शेअर करत 'कमिंग सून' असे कॅप्शन दिले. (शिखर धवन याने दाखवली बॉडी बिल्डर स्टाईल, Biceps दाखवत शेअर केला 'हा' फोटो)

बुमराहच्या या फोटोवर त्याच्या चाहत्यांनी आनंदी प्रतिक्रिया दिल्या. अनेक चाहत्यांनी त्याला पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पाहण्याची त्यांची इच्छा व्यक्त केली. पण, एक प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि ती म्हणजे इंग्लंडची स्टार महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅट (Danielle Wyatt). तिच्या दमदार फलंदाजीव्यतिरिक्त, डॅनियल सोशल मीडियावर तिच्या चतुर आणि विनोदी प्रतिक्रियांसाठीही ओळखली जाते. विराट कोहली याच्यापासून रोहित शर्मा आणि टीम इंडियाच्या अन्य खेळाडूंचे कौतुक करण्यापासून वॅट कधीच मागे राहिली नाही. तिच्या आवडत्या भारतीय क्रिकेटपटूंचा कौतुक केल्यानंतर वॅटने आता बुमराहवर निशाणा साधला आणि आपल्या वेगळ्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले.

 

View this post on Instagram

 

Coming soon! 💪🏼

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1) on

पाहा काय म्हणाली डॅनियल:

(Photo Credit: Instagram/jaspritb1)

बुमराहबद्दल बोलले तर, तो 2020 न्यूझीलंड दौऱ्यापर्यंत तंदुरुस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी, भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनीही बुमराहच्या पुनरागमनाची घडामोडींवर समाधान व्यक्त केलं होता. दरम्यान, विश्वचषकनंतर दुखापत झालेला बुमराह भारतीय संघातील दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी, हार्दिक पंड्या यालाही दुखापत झाली होती. पण, इंग्लंडमधील शस्त्रक्रियेनंतर तोही आता संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे.