पुण्याच्या गहुंजे स्टेडियम ला शरद पवार यांचे नाव देण्याची धनंजय मुंडे यांची पत्राद्वारा मागणी
15 ते 29 जून दरम्यान हे सामने रंगणार आहेत.
क्रिकेट चं वेड भारतीयांना धर्माप्रमाणे जोडणारं आहे. पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाला बीसीसीआय आणि आयसीसी चे माजी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव देण्याच्या मागणीचं पत्र माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिलं आहे. त्यांनी हे पत्र महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याकडे दिले आहे.
धनंजय मुंडे यांनी आयपीएल च्या धर्तीवर एमपीएल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याने रोहित पवार यांचे कौतुकही केले आहे. एमपीएल स्पर्धेत धनंजय मुंडे यांच्या मालकीचा छत्रपती संभाजी किंग्स हा मराठवाड्याचा संघ सहभागी झाला आहे.
पहा धनंजय मुंडे यांचं पत्र
गुजरातमधील मोटेरा स्टेडियमला जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मालकीच्या पुणे येथील गहुंजे स्टेडियमला शरद पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी रोहित पवार यांच्याकडे पत्राद्वारा केली आहे. मराठवाड्याच्या छत्रपती संभाजी किंग्स या आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी धनंजय मुंडे स्टेडियम मध्ये हजेरी देखील लावत आहेत.
एमपीएलचा यंदाचा पहिला सीझन असून यामध्ये 6 टीम्सचा सहभाग आहे. 15 ते 29 जून दरम्यान हे सामने रंगणार आहेत. 29 जूनला अंतिम सामना रंगणार आहे.