DC vs KXIP, IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार 'हे' 3 मुंबईकर, बजावू शकतात महत्त्वाची कामगिरी
दिल्लीने यंदा टीममध्ये अजिंक्य रहाणे संघात घेतले. त्याशिवाय पृथ्वी शॉ आणि श्रेयस हे मुंबईकरही दिल्ली कडून खेळणार आहेत. रहाणे यापूर्वी राजस्थान रॉयल्सकडून खेळला, तर पृथ्वीला मागील वर्षी दिल्ली टीममध्ये सामील केले गेले. मागील वर्षी दिल्लीच्या यशात कर्णधार श्रेयसने मोठी भूमिका बजावली.
आज इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 13व्या हंगामातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) यांच्यात होणार आहे. मुख्य गोष्ट म्हणजे दोन्ही संघाचे कर्णधार टीम इंडियाचे स्टार युवा खेळाडू आहेत-दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) तर पंजाबचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आहे. दोन्ही टीममधील आणखीन एक समानता म्हणजे दोन्ही टीमने आजवर एकही आयपीएल विजेतेपद मिळवले नाही. दिल्लीमध्ये शिखर धवन, अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यासारखे अनुभवी खेळाडू आहेत, तर दुसरीकडे पृथ्वी शॉ (Prithvi Shaw), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), रिषभ पंतसारखे जबरदस्त युवा फलंदाजही आहेत. दिल्लीचे नेतृत्व युवा श्रेयसकडे आहेत ज्याच्या नेतृत्वात मागील वर्षी दिल्लीने प्ले-ऑफपर्यंत मजल मारली होती. शिवाय, यंदा मुंबईचे तीन जबरदस्त खेळाडू दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसतील. (DC vs KXIP, IPL 2020: किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध आयपीएल मॅचपूर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका; इशांत शर्मा दुखापतग्रस्त, खेळण्यावर संशय)
दिल्लीने यंदा टीममध्ये अजिंक्य रहाणे संघात घेतले. त्याशिवाय पृथ्वी शॉ आणि श्रेयस हे मुंबईकरही दिल्ली कडून खेळणार आहेत. रहाणे यापूर्वी राजस्थान रॉयल्सकडून खेळला, त्याने टीमने नेतृत्व देखील केले. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ दिल्लीच्या डावाची सुरुवात करणार असल्याने रहाणेला मधल्याफळीत संधी मिळू शकते. दुसरीकडे, भारताचा अंडर-19 वर्ल्ड कप विजेता कर्णधार पृथ्वीला मागील वर्षी दिल्ली टीममध्ये सामील केले गेले. पृथ्वीने धवनसह डावाची सुरुवात केली आणि 16 सामन्यात 133.71च्या स्ट्राइक रेटने 2 अर्धशतकांसह 353 धावा केल्या होत्या. दरम्यान, मागील वर्षी दिल्लीच्या यशात कर्णधार श्रेयसने मोठी भूमिका बजावली. मागील हंगामात श्रेयसने 16 सामन्यात 3 अर्धशतकांच्या जोरावर 463 धावा केल्या होत्या. त्याने कर्णधार म्हणूनही आपल्या निर्णयाने प्रभावित केले आणि यंदा देखील त्याच्याकडून अशीच अपेक्षा असेल. हे तीनही मुंबईकर आपल्या अनुभव आणि उत्साहाने टीमसाठी महत्त्वाची कामगिरी करू शकतात.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये होणारा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या सीजनमधील हा दोन्ही टीमचा पहिला तर एकंदरीत दुसरा सामना असणार आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात टक्कर झाली होती, ज्यात सीएसकेने दणदणीत विजय मिळवला होता.