CSK vs MI IPL 2021 Match 30: मैदानात उतरताच Jasprit Bumrah ने लगावले अनोखे ‘शतक’, विराट-पोलार्डच्या क्लबमध्ये केला प्रवेश

100 पेक्षा जास्त सामने खेळणारा तो आयपीएलच्या इतिहासातील 44 वा खेळाडू ठरला. एका संघासाठी 100 किंवा अधिक सामने खेळणारा बुमराह बुमराह हा एकमेव खेळाडू नाही. या यादीत अनेक आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडूंचा समावेश आहे.

जसप्रीत बुमराह (Photo Credit: Instagram/mumbaiindians)

CSK vs MI IPL 2021 Match 30: इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) दुसरा टप्पा सुरु झाला आहे, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची धुरा किरोन पोलार्डला देण्यात आली आहे. या सामन्यासाठी रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांना विश्रांती देण्यात आली आहे. मुंबईचा तडाखेबाज वेगवान गोलंडनज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आज मुंबई इंडियन्ससाठी आपला 100 वा सामना खेळत आहे. 100 पेक्षा जास्त सामने खेळणारा तो आयपीएलच्या  (IPL) इतिहासातील 44 वा खेळाडू ठरला. बुमराहने 2013 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी पहिला सामना खेळला. जसप्रीत बुमराहने या सामन्यापूर्वी खेळलेल्या 99 सामन्यांमध्ये 115 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहच्या आगमनानंतर मुंबई इंडियन्सने 2013 पासून 5 विजेतेपद पटकावले. तथापि एका संघासाठी 100 किंवा अधिक सामने खेळणारा बुमराह बुमराह हा एकमेव खेळाडू नाही. या यादीत अनेक आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडूंचा समावेश आहे. (Why is Rohit Sharma Not Playing vs CSK: मुंबई इंडियन्सला ऐनवेळी बदलावा लागला कर्णधार, चेन्नईविरुद्ध ‘या’ कारणामुळे रोहित शर्मा नाही उतरला मैदानात)

खेळाडूंच्या या एलिट यादीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कर्णधार विराट कोहली सर्वात आघाडीवर आहे. त्याने 2008 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसह आयपीएल कारकीर्द सुरू केली आणि तेव्हापासून तो त्याच संघात खेळत आहे. सध्या तो संघाचा कर्णधार आहे. कोहलीने आतापर्यंत RCB कडून 199 सामने खेळले आहेत. विराट पाठोपाठ मुंबईचा किरन पोलार्ड देखील आहे जो आज रोहित शर्माच्या जागी संघाचे नेतृत्व करत आहे. पोलार्डचा हा 172 वा सामना असून त्याने हे सर्व सामने मुंबईसाठी खेळले आहेत. पोलार्ड 2010 पासून आयपीएलमध्ये फक्त मुंबईसाठी खेळत आहे. त्याच्या पाठोपाठ त्याचा वेस्ट इंडिज सहकारी सुनील नारायण आहे जो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. नरेनने केकेआरसाठी आतापर्यंत 124 सामने खेळले आहेत. तो 2012 पासून केकेआरकडून खेळत आहे. मुंबईचा लसिथ मलिंगा हे देखील आणखी एक नाव आहे ज्याने आयपीएलमध्ये एकाच संघासाठी 100 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. मलिंगाने मुंबईसाठी 122 सामने खेळले आहेत. मलिंगा 2009 ते 2019 पर्यंत मुंबईसाठी IPL खेळला.

दरम्यान बुमराहच्या आयपीएलमधील एक विशिष्ट कामगिरी म्हणजे आरसीबी कर्णधार विराट कोहली त्याची पहिली आणि 100 वी विकेट आहे. दुसरीकडे, आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी म्हणजे मुंबईचा स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून बाहेर बसले आहेत. रोहितच्या जागी अनमोलप्रीत सिंह तर हार्दिकच्या जागी सौरभ तिवारीचा समावेश झाला आहे.