Shubman Gill Fined: गुजरात टायटन्सचा कर्णधार गिलवर BCCI ची मोठी कारवाई, भरावा लागणार इतक्या लाखाचा दंड
स्लो ओव्हर रेटचा फटका कर्णधाराला बसतो.
चेन्नईच्या चेपॉक मैदानावर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सवर एकतर्फी विजय प्राप्त केला. या पराभवानंतर शुभमन गिलला दुहेरी धक्का बसला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सचा चेन्नईने 63 धावांनी पराभव केला. या पराभवानंतर शुभमन गिलवर सामन्या दरम्यान स्लो ओव्हररेटमुळे त्याच्यावर 12 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करत असलेल्या गुजरात टायटन्स संघाला दिलेल्या वेळेत षटकं पूर्ण करता आलेली नाहीत. (हेही वाचा - CSK Beat GT, IPL 2024 7th Match: चेन्नई सुपर किंग्जचा गुजरात टायटन्सचा 63 धावांनी विजय, फलंदाजांनंतर गोलंदाजांचीही चमकदार कामगिरी)
बीसीसीआयने स्लो ओव्हर रेटची कारवाई करत गिलवर 12 लाखांचा दंड आकारला आहे. स्लो ओव्हर रेटचा फटका कर्णधाराला बसतो. पहिल्यांदा स्लो ओव्हर रेटची कारवाई झाल्यास कर्णधारावर 12 लाखांचा दंड आकारला जातो. त्यानंतर दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटची कारवाई झाल्यास कर्णधारावर 24 लाखांचा दंड आकारला जातो. तर संघातील उर्वरीत 10 खेळाडूंवर 6 लाख दंड किंवा त्यांच्या मॅच फीवर 25 टक्के दंड आकारला जातो.
चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स संघात पार पडला. मंगळवारी चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 63 धावांनी विजय मिळवला. हा गुजरात टायटन्सविरुद्ध एखाद्या संघाने धावांच्या तुलनेत मिळवलेला सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी हा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर होता. मुंबईने 2023 आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरातला 27 धावांनी पराभूत केले होते.