CPL 2020: कॅच पकडायला गेलेल्या रोव्हमन पॉवेलची बाउंड्रीवर झाली वीरसामी पर्मुलबरोबर जोरदार टक्कर, पण पकडला क्लासिक झेल (Watch Video)
कॅरेबियन प्रीमियर लीगसह (सीपीएल) टी-20 लीगला सुरुवात झाली आहे. जमैका तलावास आणि सेंट लुसिया झुक्समध्ये दुसऱ्या दिवशी सामना झाला ज्यात तलावासचा कर्णधार रोव्हमन पॉवेल आणि फिरकीपटू वीरसामी पर्मुलची बाउंड्री लाईनवर जोरदार टक्कर झाली. अखेरीस पॉवेलने झेल पूर्ण केला परंतु संवादाच्या अभावामुळे ते एकमेकांना भिडले. सुदैवाने दोघांपैकी कोणालाही दुखापत झाली नाही.
कॅरेबियन प्रीमियर लीगसह (Caribbean Premier League) टी-20 लीगला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी, ट्रिनबॅगो नाइट रायडर्स आणि गुयाना अमेजन वॉरियर्स यांच्यात रोमांचक सामना पाहायला मिळाला ज्यात नाइट रायडर्सने अमेजन वॉरियर्सला 4 विकेट्सने पराभूत केले. टी-20 लीगच्या दुसर्या दिवशी दोन सामने पाहिले, पहिला बार्बाडोस ट्रायडंट्स आणि सेंट किट्स व नेव्हिस पैट्रियट्स यांच्यात तर त्रिनिदाद, तारौबा येथील ब्रायन लारा स्टेडियमवर जमैका तलावास (Jamaican Tallawahs) आणि सेंट लुसिया झुक्समध्ये (St Lucia Zouks) पुढील सामना झाला. रोव्हमन पॉवेलच्या (Rovman Powell) नेतृत्वात तलावासने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. झुक्सने पहिले फलंदाजी करत 7 विकेटवर 158 धावा केल्या. पण, या सामन्यात तलावासचा कर्णधार रोव्हमन पॉवेल आणि फिरकीपटू वीरसामी पर्मुलची (Veerasammy Permaul) बाउंड्री लाईनवर जोरदार टक्कर झाली. (CPL 2020 Schedule: 18 ऑगस्ट रोजी होणार कॅरिबियन प्रीमियर लीगला सुरुवात, 10 सप्टेंबर रोजी फायनल; तर त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे होणार संपूर्ण लीग)
हे सर्व 15 व्या षटकात घडले जेव्हा नजीबुल्लाह जदरानने तलावासचा फिरकीपटू संदीप लामिछानेचे चेंडूवर हवेत मारला. जदरानच्या शॉटची वेळ योग्य नसल्याने पॉवेल आणि पर्मुल अनुक्रमे लाँग-ऑन व डीपमिड विकेटवरून झेल पकडायला धावले. अखेरीस पॉवेलने झेल पूर्ण केला परंतु संवादाच्या अभावामुळे ते एकमेकांना भिडले. सुदैवाने दोघांपैकी कोणालाही दुखापत झाली नाही. कर्णधाराच्या या महान प्रयत्नाचे कौतुक करताना कॅरिबियन प्रीमियर लीगच्या (सीपीएल) अधिकृत ट्विटर हँडलने संपूर्ण घटनेची एक छोटी क्लिप शेअर केली. त्यांनी “बक्षीसावर नजर” असे कॅप्शन दिले.
सामन्याच्या सुरुवातील रहकीम कॉर्नवॉलने दोन शानदार चौकार मारून केली, पण दुसऱ्याच ओव्हरमध्ये तो बाद झाला. त्यांनतर आंद्रे फ्लेचर आणि मार्क डेयल यांनी अनुक्रमे 22 आणि 17 धावांचे योगदान दिले. रोस्टन चेस एका बाजूने खेळ करत राहिला आणि जदरानने 25 धावांनी त्याला साठी दिली, पण मोठा डाव खेळता आला नाही. चेसने 42 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 52 धावा केल्या. चेसचे टी-20 क्रिकेटमधील पाहिले अर्धशतक होते. जमैकाने 18.5 ओव्हरमध्ये 160-5 धावा केल्या. टीमसाठी आसिफ अलीने नाबाद 47, ग्लेन फिलिप्सने 44 धावा केल्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)