COVID- 19: कोरोना व्हायरसचे सावट आता आयपीएल वर सुद्धा? आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माध्यमांना दिली आहे.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएलचा 13 वा हंगाम (IPL 2020) यंदा 29 मार्च ते मे या दरम्यान खेळवला जाणार होता, मात्र आता संपूर्ण जगावर ओढवलेल्या कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) संकटाचे सावट आयपीएल वर सुद्धा ओढवण्याची शक्यता आहे. कोरोना च्या संसर्गजन्य व्हायरस पासून सावधगिरी बाळगण्यासाठी सरकारतर्फे गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे, यामुळेच आयपीएल च्या तारखा देखील पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माध्यमांना दिली आहे. IPL 2020: यावर्षीपासून आयपीएलमध्ये लागू होणार 3 नवीन महत्त्वपूर्ण नियम, सौरव गांगुली ने केल्या अनेक मोठ्या घोषणा, जाणून घ्या
"सध्या कोरोनाच्या भीतीमुळे अनेक मोठे कार्यक्रम रद्द होत आहेत. गर्दीच्या ठिकाणी अशा आजारांचा प्रसार होण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धा नंतर घेतली तरी चालू शकते. खबरदारीचा उपाय म्हणून आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याचा विचार आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे. एकीकडे, आयपीएलच्या संयोजकांकडून याबाबात पुष्टी करण्यात आलेली नाही मात्र टोपे यांच्या माहितीमुळे हा निर्णय शकतो अशी शक्यता टाळता येत नाही असे झाल्यास, जगभरातील क्रिकेट चाहत्यांना आयपीएल साठी वाट पाहावी लागू शकेल.
दरम्यान, कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात 3500 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर, भारतातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या एकाही परदेशी खेळाडूने भारतात प्रवास करण्याविषयी आक्षेप घेतलेला नाही. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमधील जवळपास 60 खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. सुदैवाने या देशांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.