IPL 2021: कोरोनाचे संकट! डेव्हिड वार्नर, स्टिव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू आयपीएलमधून माघार घेण्याची शक्यता
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ऑस्ट्रेलियाच्या अनेक खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे.
भारतात वाढत्या कोरोना संसर्गाचा आयपीएलला (IPL 2021) मोठा फटका बसत असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ऑस्ट्रेलियाच्या अनेक खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. यातच सनराईजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वार्नर (David Warner) आणि राजस्थान रॉयलचा स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) देखील आयपीएलमधून माघार घेण्याची शक्यता आहे. यामुळे मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्यामध्ये भारत येथून विमानांचे कामकाज कमी करायचे की त्यावर पूर्णपणे बंदी घालायची? यावर निर्णय घेतला जाणार आहे. कोरोनामुळे ऑस्ट्रेलिया सरकार भारतातून येणारी विमान सेवा बंद करण्याची भिती खेळाडूंना सतावत आहे.
आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाचे 17 खेळाडूंनी भाग घेतला आहे. ज्यात कमेंटेटर आणि कोचचा समावेश आहे. यातील एडम झंपा, केन रिचर्डसन (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) आणि राजस्थान रॉयल्सच्या एंड्रयू टाय यांनी आयपीएलमधून माघार घेत आपल्या मायदेशात परतले आहेत. सध्या रिकी पॉन्टिंग (दिल्ली कॅपिटल्स), डेव्हिड हसी ( कोलकाता नाईट रायडर्स), सायमन कॅटिच (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) आणि ब्रेट ली (कमेंटेटर), मायकल स्लेटर (कमेंटेटर) आणि मेथ्यू हेडन (कमेंटेटर) भारतात आहेत. हे देखील वाचा- T Natarajan Injury Update: टी नटराजन याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया; वैद्यकीय कर्मचारी, बीसीसीआय आणि चाहत्यांचे मानले आभार
ट्विट-
याचपार्श्वभूमीवर बीसीसीआयने परदेशातील खेळाडूंना मोठा दिलासा दिला आहे. आयपीएल 2021 साठी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा परतीचा मार्ग बंद झाला आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने देखील मायदेशी परतण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी खुद्द खेळाडूंवर सोपवली आहे. त्यानंतर खेळाडूंना सुखरुप मायदेशी पोहचवण्याची जबाबदारी बीसीसीआयने आपल्या खांद्यावर घेतली आहे.