Lok Sabha Election 2024: भाजप नेत्यांच्या विरोधात काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल

भाजप नेत्यांशी संबंधित एकूण 16 तक्रारी निवडणूक आयोगाला देण्यात आल्या आहेत. यावर निवडणूक आयोग कारवाई करेल, अशी अपेक्षा काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे.

Lok Sabha Election 2024: भाजप नेत्यांच्या विरोधात काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल
Election Commission of India | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि सभांमध्ये भाजपचे नेते आणि मंत्री सातत्याने देवाच्या नावाने मते मागत आहेत, तर दुसरीकडे एका विशिष्ट समाजाबाबत आक्षेपार्ह विधाने केली जात आहेत. याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली. यावेळी डॉ. अभिषेक मनु सिंघवी, गुरदीप सप्पल आणि सुप्रिया श्रीनेट उपस्थित होते. भाजप नेत्यांशी संबंधित एकूण 16 तक्रारी निवडणूक आयोगाला देण्यात आल्या आहेत. यावर निवडणूक आयोग कारवाई करेल, अशी अपेक्षा काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 22, 2024 06:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).