Cricket CWG 2022: ठरलं तर! कॉमनवेल्थ गेम्स 2022 उपांत्य फेरीत भारताचा सामना होणार 'या' मजबूत संघाशी, जाणून घ्या तारीख आणि वेळ
उपांत्य फेरीचा सामना जिंकणारे दोन्ही संघ 7 ऑगस्ट रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात सुवर्णपदकासाठी झुंजतील, तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळेल आणि त्याच दिवशी कांस्यपदकासाठी सामना होईल.
कॉमनवेल्थ गेम्स 2022 (CWG 2022) मधील इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) महिला संघादरम्यान गुरुवारी रात्री झालेल्या सामन्यानंतर उपांत्य फेरीचे वेळापत्रक स्पष्ट झाले आहे. यजमान इंग्लंडने न्युझीलंडचा 7 विकेट्स राखून पराभव करून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया आणि भारत अ गटातून तर इंग्लंड आणि न्यूझीलंडने ब गटातून पुढचा टप्पा गाठला आहे. उपांत्य फेरी मध्ये, ग्रुप अ मध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाचा पहिल्या उपांत्य फेरीमध्ये ग्रुप बी मधील टेबल टॉपवर असलेल्या इंग्लंडसोबत सामना होईल. दुसऱ्या उपांत्य फेरीत अ गटातील अव्वल ऑस्ट्रेलियाचा सामना ब गटातील दुसऱ्या स्थानावरील न्यूझीलंडशी होणार आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिला उपांत्य सामना 6 ऑगस्ट रोजी बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता खेळवला जाईल. त्याच वेळी, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा उपांत्य सामना त्याच मैदानावर सकाळी 10.30 वाजता सुरू होईल.
Women’s Cricket Semifinals Event | Fixtures | Date & Time |
First Semifinal
|
Australia vs New Zealand | 3:30 PM IST (August 6) |
Second Semifinal
|
India vs England | 10:30 PM IST (August 6) |
उपांत्य फेरीचा सामना जिंकणारे दोन्ही संघ 7 ऑगस्ट रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात सुवर्णपदकासाठी झुंजतील, तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळेल आणि त्याच दिवशी कांस्यपदकासाठी सामना होईल. सुवर्णपदकाचा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता सुरू होईल, तर कांस्यपदकाचा सामना दुपारी 2:30 वाजता ठेवण्यात आला आहे. (हे देखील वाचा: IND vs WI: रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, भारत-वेस्ट इंडिज संघाला मिळाला अमेरिकेचा व्हिसा)
ग्रुप स्टेजमध्ये भारताची कामगिरी चांगली
कॉमनवेल्थ गेम्समध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करणाऱ्या भारतीय संघाला कांगारूंकडून पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाला 3 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. अॅशले गार्डनरने अर्धशतकी खेळी करत भारताच्या तोंडून विजय हिसकावून घेतला होता. यानंतर टीम इंडियाने जोरदार पुनरागमन करत पाकिस्तानचा 8 विकेट्सने तर बार्बाडोसचा 100 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. उपांत्य फेरीतही भारतीय संघ यजमानांविरुद्ध चांगली कामगिरी करेल, अशी आशा आहे. इंग्लंड या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे.