Bumrah bowling “Gumrah” Delivery: हे कसले क्रिकेट? लोकल बुमराने उडवला बॅट्समनच्या तोंडाचा त्रिफळा, लोक म्हणाले 'Please call Physio' (Watch Video)
सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे एका छोट्या मुलाची बॉलींग पाहून अनेकांना जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah Bowling Videos) याची आठवण आली आहे. पण, बुमराहची केवळ आठवणच नव्हे तर, हा व्हिडिओ ज्या वापरकर्ताने 'X' हँडलवर शेअर केला आहे त्याने आपल्या पोस्टमध्ये ''Now that was a decent Bumrah till the release'' अशी मजेशीर प्रतिक्रयाही दिली आहे.
Funny Cricket Moments: भारत असो की पाकिस्तान क्रिकेट (Pakistani Cricket) प्रेम हा दोन्ही देशांतील समान दुवा. त्यामुळे दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींचे अनेक व्हिडिो सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यातील काही तर इतके मजेशीर (Viral Videos of Cricket) असतात की, सोशल मीडियावर ते शेअर होताच त्यावर वापरकर्त्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडतो. आताही सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे एका छोट्या मुलाची बॉलींग पाहून अनेकांना जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah Bowling Videos) याची आठवण आली आहे. पण, बुमराहची केवळ आठवणच नव्हे तर, हा व्हिडिओ ज्या वापरकर्ताने 'X' हँडलवर शेअर केला आहे त्याने आपल्या पोस्टमध्ये ''Now that was a decent Bumrah till the release'' अशी मजेशीर प्रतिक्रयाही दिली आहे.
व्हिडिओ पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथील असल्याचा दावा
सोशल मीडिया मंच असलेल्या 'X' (पुर्वीचे ट्विटर) हँडलवर @ESPNcricinfo या हँडलवरुन ESPNcricinfo या वारकर्त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने व्हिडिओसोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये ' खैबर पख्तुनख्वा येथील मसूद रहमान' असे म्हटले आहे. त्यामुळे अंदाज लावला जात आहे की, हा व्हिडिओ पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथील असावा. व्हिडिओ पाहून अनेकांनी मजा घेतली आहे. व्हिडिओखाली येणाऱ्या प्रतिक्रियाही तशाच मजेशीर आहेत. हे वृत्त लिहीपर्यंत हा व्हिडिओ जवळपास 16 हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी पाहिला आहे. तर अनेकांनी तो पुन्हा पोस्ट आणि लाईक केला आहे.
'आता थेट फिजिओलाच बोलावा'
'X' हँडलवरील Sankott नावाच्या एका यूजरने म्हटले आहे की, 'आता थेट फिजिओलाच बोलावा', दुसऱ्याने म्हटले आहे की, 'बुमराह बॉलींग 'गुमराह' डिलीव्ही', आणखी एक म्हणतो 'खरोखरच बुमराह याची कॉपी' अनेक युजर्सनी तर हा व्हिडिओ पाहून केवळ 'हाहाहाहा' असे उद्गार आणि हसण्याचेच इमूजी वापरले आहेत.
व्हिडिओ
क्रिकेट हा अनेकांचा जीव की प्राण असतो. खास करुन भारत आणि पाकिस्तानातील तरुणांचा आणि नागरिकांचाही. दोन्ही देशांचे क्रिकेट संघ जेव्हा परस्परांपुढे उभे ठाकतात तेव्हा दोन्ही देशांतील क्रिडाप्रेमी आणि क्रिकेट रसिकांचा उत्साह ओसंडून पाहतो. क्षणाक्षणाला उत्कंटा वाढत असते. पीढ्यानपीठ्या हेच क्रिकेट प्रेम दोन्ही देशांच्या क्रिकेटप्रेमींच्या नसानसात भिनले आहे. त्याचमुळे तर अबालवृद्ध क्रिकेटच्या गप्पा, किस्से आणि मैदान यामध्ये रंगलेले असतात. लहान मुलांपासून ते त्यांच्या आजोबांपर्यंत अनेक कुटुंबांमध्ये एकच समान घटक असतो तो म्हणजे क्रिकेट. दोन्ही देशांतील अनेक कुटुंबे, पिढ्या या क्रिकेट हा जणू धर्म असल्यासारखे जगतात, अनुभवतात आणि खेळतातही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)