BCCI Announces The Schedule for England Serie: भारत-इंग्लंड क्रिकेट मालिका, बिसीसीआयने जाहीर केले वेळापत्रक
हा संघ मायदेशात आल्यावर नव्या वर्षाची सुरुवात इंग्लंडसोबतच्या सामन्याने करणार आहे. भारत दौऱ्याची सुरुवात इंग्लंड चार सामन्यांच्या कसोटी सामन्यांनी करणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) अर्थातच बीसीसीआयने नव्या वर्षात होणाऱ्या इंग्लंडच्या भारत दौऱ्याबाबतचा कार्यक्रम आणि वेळापत्रक जाहीर (BCCI Announces The Schedule for England Serie) केले आहे. कोरोना व्हायरस संकटानंतर सावरत असलेल्या जगामध्ये भारत- इंग्लंड यांच्यात होणारी ही पहिलीच मालिका आहे. त्यामुळे क्रीडा आणि क्रिकेट वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार भारत-इंग्लंड यांच्यात चार कसोटी, पाच टी-20 आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. हा संघ मायदेशात आल्यावर नव्या वर्षाची सुरुवात इंग्लंडसोबतच्या सामन्याने करणार आहे.
भारत दौऱ्याची सुरुवात इंग्लंड चार सामन्यांच्या कसोटी सामन्यांनी करणार आहे. भारत आणि इंग्लंड संघामध्ये होणारा पहिला कसोटी सामना 5 ते 9, दुसरा 13 ते 17 चेन्नई येथे. तिसरा कसोटी सामना 24 ते 28 फेब्रुवारी या काळात अहमदाबाद येथे पार पडणार आहे. हा सामना डे-नाईट खेळला जाईल. या मालिकेतील चौथा आणि अखेरचा सामना 4 ते 8 मार्च या काळात होईल. (हेही वाचा, Google Year in Search 2020: आयपीएल, UEFA Champions League, फ्रेंच ओपनसह यंदा भारतात गूगलवर 'या' खेळ स्पर्धांची रंगली चर्चा)
टी 20 मालिकेतील सामन्यांचे वेळापत्रक पारता पहिला सामना 12 मार्च, दुसरा सामना 14 मार्च, तिसरा सामना 16 मार्च, चौथा सामना 18 मार्च आणि पाचवा सामना 20 मार्चला खेळला जाणार आहे. बीसीसीआयने म्हटले आहे की, टी 20 सामन्यांप्रमाणेच एकदिवसीय सामनेही पुणे येथे खेळवले जातील.