KPL मॅच फिक्सिंग प्रकरणात बेंगळुरू पोलिसांनी 16 जणांविरूद्ध दाखल केले आरोपपत्र
या मॅच फिक्सिंग घोटाळ्यात अनेक खेळाडू आणि संघ मालक अडकले आहेत. आणि आता बेंगळुरू पोलिसांनी फिक्सिंगसाठी काही खेळाडूंसह एकूण 16 जणांविरुद्ध चार्जशीट दाखल केले आहे.
कर्नाटका प्रीमिअर लीग (Karnataka Premier League) मधील मॅच फिक्सिंग प्रकरणात बेंगळुरू पोलिसांनी (Bengaluru Police) आरोपपत्र दाखक केले आहे. या मॅच फिक्सिंग घोटाळ्यात अनेक खेळाडू आणि संघ मालक अडकले आहेत. आणि आता बेंगळुरू पोलिसांनी फिक्सिंगसाठी काही खेळाडूंसह एकूण 16 जणांविरुद्ध चार्जशीट दाखल केले आहे. कर्नाटक प्रीमियर लीगमधील मॅच फिक्सिंगचे (Match Fixing) आरोप गेल्या काही वर्षांत वारंवार होत असल्याने यंदा मोठी कारवाई करण्यात आली आहे. या आरोप पात्रात सीएम गौतम (CM Gautam) चाही समावेश आहे ज्याने 100 डोमेस्टिक सामने खेळले आहेत. याखेरीज आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा देखील सदस्य होता. गौतमला यापूर्वी अटक करण्यात आली होता, मात्र नंतर त्याला 17 डिसेंबर रोजी जामीन मिळाला.
याशिवाय, तेथील पोलिसांनी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आणि केपीएलच्या सर्व फ्रेंचायझींकडून 18 प्रश्न विचारले आहेत. ज्या नोटीसवर पोलिसांनी लवकरच जाब विचारला आहे. गौतमशिवाय अबरार काझीही यात सहभागी आहेत. अबरार रणजी क्रिकेट खेळला आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त संदीप पाटील म्हणाले की, तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये कब्बन पार्क पोलिस स्टेशन, जेपी नगर पोलीस ठाणे आणि भारती नगर पोलिस ठाण्यात आरोपपत्र दाखल केले गेले आहे. पहिल्या पोलिस ठाण्यात सहा जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले, तर दुसऱ्या पोलिस स्टेशन चौघांच्या विरोधात होते तर तिसऱ्यामध्ये सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्या आला आहे.
बेलगावी पँथर्सचा मालक अली असफाक थारा आणि बेल्लारी टस्कर्सचा अरविंद रेड्डी आणि केएससीए मॅनेजमेंट कमिटी सदस्य सुधींद्र सिंधे, बुकी अमित मावी आणि दोन मोठे क्रिकेटपटू यांच्या विरोधात कब्बन पार्क पोलिस ठाण्यात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. भारती नगर पोलिस ठाण्यात ज्या सहा जणांविरूद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांची ओळख अद्याप समोर आलेले नाही.