IPL 2022 Mega Auction: डिसेंबर महिन्यात होऊ शकतो मेगा लिलाव, आयपीएल फ्रँचायझींना इतक्या खेळाडूंना रिटेन करण्याची असेल परवानगी

अद्याप अधिकृत घोषणा होणार बाकी असली तरी टाईम्स ऑफ इंडियाने सांगितले की या वर्षअखेरीस डिसेंबरमध्ये बिडिंग कार्यक्रम होणार आहे. तसेच हवालात असाही दावा केला गेला आहे की खेळाडूंच्या रिटेंशन नियमात देखील बदल केले जातील.

आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022 Mega Auction: बीसीसीआय इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या उर्वरित 31 सामन्यांचे सुरळीत आयोजनासाठी तयारी करत आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएलचे (IPL) उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) हलवण्यात आले आहेत. 2021 आवृत्ती अद्याप संपलेली नसताना बीसीसीआयने (BCCI) पुढच्या हंगामाबाबत विचार करण्यास सुरुवात केली आहे. जगभरात प्रसिद्ध टी-20 लीगच्या 2022 हंगामात मोठे बदल होणार असून दोन नवीन संघ सामील होणार आहेत. विशेष म्हणजे, स्पर्धेपूर्वी मेगा लिलावही आयोजित करण्यात येणार आहे ज्यामध्ये प्रत्येक संघात मोठ्या प्रमाणात बदल घडतील. अद्याप अधिकृत घोषणा होणार बाकी असली तरी टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार  या वर्षअखेरीस डिसेंबरमध्ये बिडिंग कार्यक्रम होणार आहे. (IPL 2022 New Teams: आयपीएलमध्ये दोन नव्या संघांच्या लिलावाची प्रतीक्षा लांबणीवर, BCCI अधिकाऱ्याने सांगितले हे कारण)

तसेच हवालात असाही दावा केला गेला आहे की खेळाडूंच्या रिटेंशन नियमात देखील बदल केले जातील. यापूर्वी फ्रँचायझींना तीन खेळाडू कायम ठेवण्याची मुभा होती तर दोन राईट-टू मॅच (RTM) पर्याय होते. तथापि, बीसीसीआय प्रत्येक संघाला पुढील हंगामातील बोलीपूर्वी चार खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी देईल. शिवाय, प्रत्येक फ्रँचायझीची पर्स रक्कम 85 कोटी वरून 90 करोड पर्यंत केली जाईल आणि एकूण पगारामध्ये 50 कोटींची भर पडेल. सर्व संघांनी त्यांच्या वितरित पैशाच्या किमान 75% रक्कम खर्च करणे अनिवार्य असेल. तसेच, लिलावापूर्वी फ्रँचायझीने कायम ठेवलेल्या खेळाडूंची रक्कम त्यांच्या पर्समधून कपात केली पाहिजे.

मेघा लिलाव फ्रँचायझींसाठी मोठा दिलासादायक ठरेल जे पुन्हा संघ बांधणीची तयारी करत आहेत. 2022 पासून दोन नवीन संघ आयपीएल शर्यतीती समाविष्ट होण्याची शक्यता असल्याने मेगा लिलाव आणखी रोचक झाला आहे.सुरुवातीला, मेगा लिलाव आयपीएल 2021 च्या आधी होणार होता परंतु महामारीमुळे फ्रेंचायझीचे नुकसान झाले आणि आयपीएल 2020 व 2021 दरम्यान जास्त वेळ नसल्यामुळे मेगा लिलाव एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आला. मेगा लिलाव यावर्षी डिसेंबरमध्ये होणार असून दोन नवीन फ्रँचायझी ऑक्टोबरपर्यंत सादर केल्या जातील. नवीन आयपीएल संघ खरेदी करण्यात रस दाखवणाऱ्यांपैकी; कोलकातास्थित आरपी-संजीव गोएंका गट; अहमदाबादमधील अदानी गट; हैदराबादस्थित अरबिंदो फार्मा लिमिटेड आणि गुजरातमधील टोरंट ग्रुप यांचा समावेश आहे.