BBL 2020-21 मधील नवीन नियमांची वासिम जाफर यांनी Gangs Of Wasseypur मीम शेअर करून उडवली खिल्ली
ऑस्ट्रेलियाच्या प्रीमियर टी-20 लीगमध्ये यंदा नवीन नियमाची भर घालण्यात आले आहे. भारताचा माजी कसोटीपटू वासिम जाफरने देखील ट्विटरवर एक मीम शेअर करून नियमांची खिल्ली उडवली. बीबीएलचे नवे नियम पाहून वसीम जाफरने 'गँग्स ऑफ वासेपुर' या बॉलिवूड चित्रपटाचा एक मजेदार डायलॉग मिम शेअर केला.
बिग बॅश लीगने (Big Bash League) नवीन हंगामापूर्वी तीन नवीन नियम जारी करून नवीन वाद सुरु केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या प्रीमियर टी-20 लीगमध्ये यंदा नवीन नियमाची भर घालण्यात आले आहे. बीबीएल पॉवर सर्ज, एक्स फॅक्टर प्लेयर आणि बॅश बूट असे हे तीन नियम पारंपारिक क्रिकेट नियमांपेक्षा वेगळे असलेले हे नियम पाहून अनेकांचा गोंधळ उडाला त्यामुळे, सोशल मीडियावर सध्या या नियमांची खिल्ली उडवली जात आहे. या तीन नव्या नियमांवर चाहते, माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट तज्ज्ञांनी मिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या दरम्यान, भारताचा माजी कसोटीपटू वासिम जाफरने (Wasim Jaffer) देखील ट्विटरवर एक मीम शेअर करून नियमांची खिल्ली उडवली. बीबीएलचे नवे नियम पाहून जाफरने 'गँग्स ऑफ वासेपुर' (Gangs Of Wasseypur) या बॉलिवूड चित्रपटाचा एक मजेदार डायलॉग मिम शेअर केला आणि या नियमाने तो प्रभावित झाला नसल्याचे दिसून येते. बीबीएलच्या नवीन नियमांवर (BBL New Rules) आपली प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ही मिम शेअर केली. (BBL 2020-21 Schedule: बिग बॅश लीग सीझन 10 ची 'या' दिवसापासून होबार्ट आणि कॅनबेरा बबलमध्ये होणार सुरुवात, पाहा वेळापत्रक)
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 16 नोव्हेंबर रोजी बीबीएलमधील नवीन नियमांची माहिती दिली होती. ते ट्विट रिट्विट करत जाफरने, ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटातील एका वाक्याचा मिम शेअर केला ज्यात बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीच्या फोटोखाली, “ये क्या बवासीर बना दिए हो..” असे लिहिले आहे. दरम्यान, बिग बॅश लीगमधील या तीनही नियमांमुळे सामने अधिक चुरशीचे होतील, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले. मात्र, या नियमांवर मिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अनेकांनी हे नियम फलंदाजांच्या फायद्यासाठी असल्याचे म्हटले आहे. पाहा जाफर यांची मजेदार प्रतिक्रिया...
बीबीएलमध्ये या वर्षापासून एक्स फॅक्टरचा नवीन नियम लागू होईल. ज्यानुसार आता प्रत्येक संघाला 12 किंवा 13 खेळाडूंची नावे जाहीर करण्याची संधी मिळेल. सामन्यादरम्यान या एक्स फॅक्टर खेळाडूला मैदानावर कोणत्याही वेळी गोलंदाजी किंवा फलंदाजीसाठी पाठवले जाऊ शकते, पण याला अट म्हणजे ज्या खेळाडूच्या जागी एक्स फॅक्टर पाठवला जाईल त्याने एकापेक्षा जास्त ओव्हर टाकले नसावेत आणि फलंदाजीसाठी उतरला नसावा. सामन्यात 10व्या ओव्हरनंतर संघांना एक्स फॅक्टर वापरण्याची परवानगी दिली जाईल. पावर सर्ज दोन ओव्हरचा पॉवर प्ले असणार आणि डावातील 10 ओव्हर दरम्यान फलंदाजी करणारा संघ कधीही घेऊ शकतो. यावेळी 30 यार्डच्या परिघाच्या बाहेर केवळ दोन क्षेत्ररक्षक ठेवण्याची मुभा दिली जाईल.