BBL 2020-21: डार्सी शॉर्टने राशिद खानच्या ओव्हरमध्ये चोपल्या 24 धावा, नंबर-1 टी-20 बॉलरने बाउंड्री लाईनवर घेतला थरारक कॅच, पाहा Videos
हरिकेन्सच्या डावाची शानदार सुरुवात झाल्यानंतर राशिद गोलंदाजी करण्यास आला. पहिल्या दोन प्रभावी ओव्हरनंतर डार्सी शॉर्टने 22-वर्षीय अफगाण गोलंदाजाची धुलाई केली आणि एका ओव्हरमध्ये 24 धावा चोपल्या.
BBL 2020-21: राशिद खान (Rashia Khan) क्रिकेटच्या मैदानावरून कधीच दूर राहिलेला नाही आणि होबार्ट हरिकेन (Hobart Hurricanes) आणि अॅडिलेड स्ट्रायकर्स (Adelaide Strikers) यांच्यातील बिग बॅश लीग (Big Bash League) 2020-21 मॅच दरम्यान अफगाण क्रिकेटपटूने बाउंड्री लाईनवर थरारक झेल पकडला. यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून प्ले-ऑफ खेळल्यावर 22 वर्षीय गोलंदाज पुन्हा मैदानात परतला. स्ट्रायकर्सच्या बीबीएल 10 सीझन सलामीच्या सामन्यात राशिदला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. होबार्ट हरिकेनच्या डावाच्या 16व्या ओव्हरमध्ये राशिद खानने धोकादायक कॉलिन इंग्रामला (Colin Ingram) बाद करण्यासाठी सीमारेषेवर सनसनाटी झेल घेतला. इंग्रामने चेंडू बाउंड्री लाईनच्या पार नेण्याचा पर्यंत केला, पण राशिदने चेंडू सीमारेषेपारजाण्यापूर्वी मैदानातील आतील बाजूस हवेत उडी मारली आणि जबरदस्त कॅच पकडला. (BBL 2020-21: अरे देवा! फलंदाजाच्या टी-शर्टमध्ये घुसला बॉल, नकळत घेतली चोरटी धाव, हा मजेदार व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल Watch Video)
होबार्ट हरिकेन्सच्या डावाची शानदार सुरुवात झाल्यानंतर खेळाच्या पाचव्या ओव्हरमध्ये राशिद गोलंदाजी करण्यास आला. पहिल्या दोन प्रभावी ओव्हरनंतर डार्सी शॉर्टने (D'Arcy Short) 22-वर्षीय अफगाण गोलंदाजाची धुलाई केली आणि एका ओव्हरमध्ये 24 धावा चोपल्या. शॉर्टने राशिदच्या पहिल्या दोन चेंडूवर जबरदस्त षटकार खेचले तर तिसऱ्यावर चौकार मारल्यावर चौथ्या चेंडूवर आणखी एक षटकार मारला. मात्र, अखेरच्या चेंडूवर त्याला फक्त दोन धावाच मिळाल्या. यासह शॉर्टने नवीन सत्रातील पहिले अर्धशतक झळकावले. पाहा शॉर्टचे ब्रिलियन्स
राशिद खानला अफलातून झेल
दरम्यान, डार्सी शॉर्टने हरिकेन्ससाठी प्रेरणादायक खेळी खेळली पण त्याच्या बाद झाल्यानंतर स्ट्रायकर्सने पीटर हँड्सकॉम्बच्या नेतृत्त्वातील संघाला केवळ 174 धावांवर रोखले. वेस अगरने 2 तर राशिद आणि पीटर सिडल यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. यंदाच्या बिग बॅश लीग हंगामाच्या सलामीच्या सामन्यात होबार्ट हरिकेन संघाने विजयी सुरुवात केली आणि गतविजेत्या चॅम्पियन सिडनी सिक्सर्सचा पराभव केला असून यंदाच्या सामन्यात विजयाची पुरावृत्ती करण्याचा त्यांचा निर्धार असेल. दरम्यान, अॅडिलेड स्ट्रायकर्स विजयासह मोहीम सुरुवात करू पाहत असतील.