Australia vs Pakistan 3rd T20 2024 Live Streaming In India: ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत; येथे जाणून घ्या भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
दुसऱ्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जोश इंग्लिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून केवळ 147 धावा करता आल्या.
Australia National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 3rd T20I Match 2024 Live Streaming: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा सामना आज म्हणजेच 18 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाईल. दुसऱ्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान संघाचा 13 धावांनी पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाची कमान जोश इंग्लिसच्या खांद्यावर आहे. तर पाकिस्तानचे नेतृत्व मोहम्मद रिझवानकडे आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. ()
दुसऱ्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जोश इंग्लिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून केवळ 147 धावा करता आल्या. हा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तान संघाला 20 षटकात 148 धावा करायच्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ 19.4 षटकांत केवळ 134 धावा करत अपयशी ठरला. पाकिस्तानकडून उस्मान खानने 52 धावांची शानदार खेळी केली.
हेड टू हेड रेकॉर्ड
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 27 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसत आहे. ऑस्ट्रेलियाने 27 पैकी 15 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने 11 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला. 2022 मध्ये दोन्ही संघ शेवटच्या टी-20 मध्ये भिडले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ३ गडी राखून पराभव केला. हेड टू हेड रेकॉर्ड पाहता ऑस्ट्रेलियाचा संघ अधिक मजबूत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला हरवणे पाकिस्तानसाठी तितके सोपे नसेल.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा टी 20 सामना कधी होणार?
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा टी 20 सामना सोमवारी 18 नोव्हेंबर रोजी बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता खेळवला जाईल. तर नाणेफेकीची वेळ या आधी अर्धा तास असेल.
थेट सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा?
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा टी 20 सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल. याशिवाय, तुम्ही Disney+ Hotstar ॲपवर लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
ऑस्ट्रेलिया: जेक फ्रेझर-मॅकगर्क, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, आरोन हार्डी, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन.
मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टिरक्षक), बाबर आझम, साहिबजादा फरहान, उस्मान खान, आगा सलमान, इरफान खान, हसिबुल्ला खान, अब्बास आफ्रिदी, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह.
(The above story first appeared on LatestLY on Nov 18, 2024 11:04 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

