ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्लिंजर याचा टी-20 क्रिकेटमध्ये पराक्रम, क्रिस गेल याच्यानंतर सर्वाधिक शतकांचा विक्रम
टी-20 ब्लास्टमध्ये क्लिंजरने आठवे शतक करत 65 चेंडूत नाबाद 102 धवनची खेळी केली. केवळ वेस्ट इंडिजचा क्रिस गेलच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 21 शतकांचा रेकॉर्ड आहे.
पुरुषांच्या टी-20 शतकांच्या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लिंजर (Michael Klinger) दुसर्या स्थानावर पोहचला. टी-20 ब्लास्टमध्ये क्लिंजरने आठवे शतक करत 65 चेंडूत नाबाद 102 धवनची खेळी केली. केवळ वेस्ट इंडिजचा क्रिस गेल (Chris Gayle) याच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 21 शतकांचा रेकॉर्ड आहे. अॅरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर, ल्यूक राइट आणि ब्रेंडन मॅक्युलम हे सात सात शतक करत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या हंगामात 21 वर्षांची कारकीर्द संपुष्टात आणणाऱ्या 39 वर्षीय क्लिंजरने केंटविरुद्ध ग्लॉस्टरशायरच्या 65 चेंडूत नाबाद 102 धावा फटकावून आपल्यात अद्याप तो दम असल्याचे दाखवले.
क्लिंजरच्या तुफानी खेळीच्या जोरावर ग्लॉस्टरशायर (Gloucestershire) संघाला 3 बाद 183 धावसंख्या उभी करता आली. आणि खेरीस दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिस याची एकाकी झुंज व्यर्थ गेली आणि कॅंटला (Kent) पाच धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताचा रोहित शर्मा याच्या नावावर टी-20 मध्ये सहा शतक जमा आहे.
"माझे 100 झेले हे देखील माहित नव्हते कारण मुख्य स्कोअरबोर्डवर 91 होते," क्लिंजरने आयसीसीला म्हटले. "खरं सांगायचं तर मी जवळ होतो हेदेखील न कळता थोडा दबाव घेतला."