AUS vs NZ, ICC Womens T20 World Cup 2024 Live Streaming: महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आमनेसामने, थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल?

ऑस्ट्रेलिया महिला संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला संघ या दोन दिग्गज टीममध्ये आजचा सामना होत आहे. उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

Photo Credit- X

AUS vs NZ, ICC Women's T20 World Cup 2024 Live Streaming: 2024 च्या आयसीसी महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेतील 10 वा सामना आज ऑस्ट्रेलिया महिला संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला संघ यांच्यात होणार आहे. संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. ऑस्ट्रेलिया संघाने टी-20 विश्वचषकात श्रीलंकेवर विजयाने खाते खोलले होते. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा 6 विकेट्सने पराभव केला होता. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या स्पर्धेत दुसरा विजय नोंदवायचा आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडनेही आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. पहिल्या सामन्यात भारताचा 58 धावांनी पराभव केला. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून स्पर्धेत दुसरा विजय नोंदविण्याकडे न्यूझीलंडचे लक्ष आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. (हेही वाचा: Pakistan vs England 1st Test 2nd Day Live Streaming: इंग्लंडविरोधातील कसोटी सामन्याचा पहिला दिवसा पाक फलंदाजांनी गाजवला, दुसऱ्या दिवशीच्या खेळाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल? घ्या जाणून)

2024 आयसीसी महिला टी 20 विश्वचषकाचा 10 वा सामना ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला यांच्यात कधी खेळवला जाईल?

2024 आयसीसी महिला टी 20 विश्वचषकाचा 10 वा सामना ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला यांच्यात मंगळवारी 8 ऑक्टोबर रोजी शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाईल.

थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

2024 च्या आयसीसी महिला टी 20 विश्वचषकातील सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केले जातील. टीव्हीवर ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला यांच्यातील सामन्याचा आनंद घेता येईल. याशिवाय, डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह-स्ट्रीम केले जाईल.

दोन्ही संघांचे खेळाडू

न्यूझीलंड महिला संघ: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (सी), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), जेस केर, रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन, हन्ना रो, फ्रॅन जोनास, लेह कॅस्परेक, मॉली पेनफोल्ड

ऑस्ट्रेलिया महिला संघ: बेथ मूनी, ॲलिसा हिली (विकेटकीपर/सी), जॉर्जिया वेअरहॅम, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शट, डार्सी ब्राउन, ग्रेस हॅरिस, किम गर्थ, अलाना किंग, टायला व्लामिंक



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif