‘ICC World Test Championship फायनलसाठी टीम इंडिया पात्र ठरल्यास Asia Cup 2021 स्थगित होणार’, PCB प्रमुख एहसान मनी यांचे मोठे विधान
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष एहसान मनी यांनी म्हटले की सध्या सुरू असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया पात्र ठरल्यास आशिया चषक 2021 स्पर्धा पुढे ढकलली जाईल. एशिया कप 2021 यंदा जून महिन्यात आयोजित होणार आहे पण स्पर्धेच्या तारखा त्याच महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलशी जुळत आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) अध्यक्ष एहसान मनी (Ehsan Mani) यांनी म्हटले की सध्या सुरू असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया पात्र ठरल्यास आशिया चषक (Asia Cup) 2021 स्पर्धा पुढे ढकलली जाईल. एशिया कप 2021 यंदा जून महिन्यात आयोजित होणार आहे पण स्पर्धेच्या तारखा त्याच महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलशी (WTC Final) जुळत आहेत. रविवारी पत्रकारांशी बोलताना पीसीबीचे (PCB) मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आशिया चषक 2021 यासह अनेक विषयांच्या प्रश्नांना संबोधित केले. मणी म्हणाले की, WTCच्या अंतिम सामन्यामुळे बहु-देशी स्पर्धा 2023 पर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते. इंग्लंडविरुद्ध सध्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी मालिकेच्या अंतिम सामन्यात विजय किंवा किमान सामना ड्रॉ करण्याची गरज आहे. (ICC T20 World Cup 2021: भारतात पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचे अनावरण, BCCI अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले- ‘21 ही भारताची वेळ आहे’)
“गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे आम्ही 2020 मध्ये श्रीलंका येथे होणारा आशिया चषक बदलला होता. तथापि, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपशी त्याच्या तारखा जुळत आहे आणि म्हणूनच आता 2023 मध्ये ही स्पर्धा होईल,” मनी म्हणाले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18-22 जून दरम्यान लॉर्ड्स येथे होणार आहे. शिवाय, आयसीसीने त्यांना पुढील महिन्यात वर्ल्ड टी-20 कप स्पर्धेसाठी सर्व खेळाडू, अधिकारी, चाहते आणि पत्रकारांना व्हिसा देण्यात येणार असल्याचं बीसीसीआयकडून लेखी आश्वासन मिळणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे मनी यांनी सांगितले. “मी बोर्डला कळविले आहे की बीसीसीआय आम्हाला 31 डिसेंबरपर्यंत व्हिसाची हमी, पण तसे झाले नाही कारण त्यांचे अध्यक्ष, सौरव गांगुली यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,” ते येथे पत्रकार परिषदेत म्हणाले. “पण मी आता हे प्रकरण पुन्हा आयसीसीकडे उचलले आहे आणि त्यांच्या संपर्कात आहे. या विषयावर उद्या त्यांच्याबरोबर माझी आणखी एक व्हर्च्युअल बैठक आहे. आम्हाला पुढील महिन्याच्या अखेरीस आपली लेखी हमी मिळेल असे आयसीसीने आम्हाला सांगितले.”
पीसीबी प्रमुख म्हणाले की, या आश्वासनाची मागणी करणे हा त्यांचा अधिकार आहे आणि कोणीही पाकिस्तानला वर्ल्ड कपपासून दूर ठेवू शकत नाही. ते म्हणाले की, “एकतर आम्ही पूर्ण वर्ल्ड टी-20 कपमध्ये जाणार किंवा तो अन्यत्र हलवावा लागेल.”
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)