IPL Auction 2025 Live

Asad Rauf Passes Away: पाकिस्तानी अम्पायर Asad Rauf यांचे निधन; वयाच्या 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

2000 च्या सुरूवातीला त्यांनी अम्पायरिंग करायला सुरूवात केली.

पाकिस्तानचा माजी ICC अम्पायर Asad Rauf यांचे निधन झाले आहे. ते 66 वर्षांचे होते. मीडीया रिपोर्ट्सनुसार, cardiac arrest ने त्यांचे निधन पाकिस्तानच्या लाहोर मध्ये झाले आहे. Asad Rauf यांनी 13 वर्षांच्या कारकिर्दिमध्ये 231 सामन्यांसाठी अम्पायरिंग केले होते. 2000 च्या सुरूवातीला त्यांनी अम्पायरिंग करायला सुरूवात केली. त्यानंतर 2006 साली त्यांना ICC's elite panel मध्ये बढती दिली. पुढील 7 वर्षांत ते पाकिस्तानचे नावाजलेले अम्पायर बनले होते.

Aleem Dar यांच्यासोबत Rauf यांचा झालेला उत्कर्ष याने पाकिस्तानच्या अम्पायरिंग पॅनलला मानाचं स्थान मिळालं. त्यांनी 1998 साली अम्पायरिंग क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. तेव्हा ते फर्स्ट क्लास गेमचं अम्पायरिंग केले होते. 2004 मध्ये त्यांना ओडीआय पॅनलमध्ये संधी मिळाली.

Rauf यांचा व्हिडिओ वायरल झाला होता त्यामध्ये ते पाकिस्तानच्या प्रसिद्ध लांडा बाजारात शूज विकताना दिसले होते. रौफने नमूद केले की अंतिम एकदिवसीय सामन्यात उभे राहिल्यानंतर 10 वर्षांनी, त्याने क्रिकेटमधील रस गमावला आहे आणि आता त्याला त्याच्या नवीन भूमिकेत उत्कृष्ट कामगिरी करायची आहे.

Rauf यांच्यावर 2013 IPL spot-fixing scandal मध्येही आरोप झाले होते. त्यांनी सट्टेबाजांकडून भेटवस्तू स्वीकारल्याचेही आरोप झाले होते. वर्षभरापूर्वी, रौफवर मुंबईतील एका मॉडेलने लैंगिक शोषणाचा आरोपही झाला होता. त्याने लग्नाचं वचन देऊन नंतर पाठ फिरवल्याचा दावा केला आहे.