Ambati Rayudu Retires: अंबाती रायुडू याच्या निर्णयावर गौतम गंभीर नाखूष, म्हणाला या कारणाने घेतली निवृत्ती
रायुडूच्या निवृत्तीबद्दल भाष्य करताना भारताचा माजी सलामीवीर आणि बीजेपी खासदार गौतम गंभीर ने भारतीय निवडक समिती वर टीका करत अनुभवी रायुडू यांच्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे म्हटले आहे.
भारताचा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज अंबाती रायुडू (Ambati Rayudu) ने धक्कादायक पणे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सर्वांसाठी हा अकल्पनीय असा होता. इंग्लंड (England) मधील आयसीसी (ICC) विश्वकपसाठी राखीव फलंदाज म्हणून रायडूची निवड करण्यात आली होती. मात्र शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि विजय शंकर (Vijay Shankar) दुखापतग्रस्त झाल्यानंतरही त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. रायडूने बीसीसीआय (BCCI) च्या सर्व फॉरमॅटमधून आणि आयपीएल (IPL) मधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. रायुडूच्या निवृत्तीबद्दल भाष्य करताना भारताचा माजी सलामीवीर आणि बीजेपी (BJP) खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) ने भारतीय निवडक समिती वर टीका करत अनुभवी रायुडू यांच्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे म्हटले आहे. (भारतीय फलंदाज अंबाती रायुडू ची क्रिकेटमधून निवृत्ती, World Cup साठी वारंवार केले जात होते दुर्लक्ष)
स्टार स्पोर्ट्स (Star Sports) च्या फिलिप्स ह्यू क्रिकेट लाइव्हवर गंभीर म्हणाला, "माझ्या मते, विश्वकप निवड समितीने यंदा पूर्ण निराशा केली आहे. निवृत्तीचा निर्णय रायुडूने त्यांच्यामुळे आहे आणि त्यांच्या निर्णय घेण्याच्या कौशल्यावर दोष केले पाहिजे."
पुढे, गंभीर निवड समितीवर राग धरत म्हणाला,"निवड समितीच्या पाच सदस्य एकत्र येऊन एवढ्या धावा करून शकत नाही जेवढ्या रायुडूने आपल्या कारकीर्दीत केल्या आहेत. मला त्याच्या निवृत्तीबद्ददल फार वाईट वाटतेय".
"विश्वकपमध्ये रिषभ पंत (Rishabh Pant) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) ची निवड संघातील सदस्यांना दुखापत झाल्यावर झाली आणि रायुडूच्या जागीही दुसरे कोणी असते त्याला ही वाईट वाटले असते. रायुडू सारखा खेळाडू ज्याने आयपीएल मध्ये चांगला खेळ केला आहे. देशासाठी 50 'च्या सरासरीने धावा केल्या आहेत आणि अशा खेळाडूने निवृत्ती घेतली तर तो भारतीय क्रिकेटसाठी एक दुःखद क्षण आहे."
रायडूने आपल्या 17 वर्षीय क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्ती घेतली आहे. 2013 साली वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रायुडूने शेवटचा सामना गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया विरोधात खेळला होता. दुरीकडे, रायडू चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाकडून आयपीएल खेळतो. रायुडूने 55 वनडे सामने खेळात 1694 धावा केल्या आहेत. यात तीन शतक आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 55 सामन्यात 47.05च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. तर, आतापर्यंत 6 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 42 धावा केल्या आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jul 03, 2019 04:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

