अजिंक्य रहाणे याच्या घरी येणार नवीन पाहुणा, पत्नी राधिकाच्या डोहाळेजेवणाचे Photo शेअर करत सांगितली गुड न्यूज

अजिंक्यने आपली पत्नी राधीका सोबत डोहाळेजेवणाचा फोटो अजिंक्यने शेअर करत ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.

अजिंक्य रहाणे आणि पत्नी राधिका (Photo Credit: Ajinkya Rahane/Instagram)

भारतीय टेस्ट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) लवकरच बाबा होणार आहे. अजिंक्यने आपली पत्नी राधीका (Radhika) सोबत डोहाळेजेवणाचा फोटो अजिंक्यने शेअर करत ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. अजिंक्य आणि राधिका हे लहान पानापासूनचे मित्र आहे. कॉलेजमध्ये दोघांचीही प्रेमकहाणी फुलली, त्यानंतर या प्रेमकहाणीला पुढे नेट 26 नोव्हेंबर 2014 मध्ये अजिंक्य आणि राधिका विवाहबंधनात अडकले. प्रदीर्घ कालावधीनंतर अजिंक्यने भारतीय संघात (Indian Team) पुनरागमन केले आहे. भारताच्या आगामी वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यात त्याची टेस्ट संघामध्ये निवड करण्यात आली आहे. (Doping संदर्भात बंदीनंतर पृथ्वी शॉ याने दिले स्पष्टीकरण, सांगितली चूक कुठे झाली)

अजिंक्य याची विश्वचषकसाठी निवड करण्यात आली नव्हती. पण आता आगामी विंडीज टेस्ट मालिकेत तो पुन्हा एकदा भारतीय संघाच्या वनडे आणि टी-20 संघात वापसी करण्याचे त्याचे प्रयत्न असतील. दरम्यान, अजिंक्य आणि राधिका नुकतेच विम्बल्डन (Wimbledon) बघण्यासाठी इंग्लंडमध्ये होते. त्याचे टेनिस कोर्टवरचे फोटो व्हायरल झाले होते.

दुसरीकडे, अजिंक्यला 2018 मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. मागील वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावेळी अजिंक्यला पहिल्या दोन टेस्ट सामन्यात संधी मिळाली नव्हती. पण त्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात, आणि नंतर घरच्या मैदानावर विंडीज विरुद्ध टेस्ट सामने खेळण्याची संधी त्याला मिळाली. पण, मागील काही सामन्यांत त्याला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.