Afghanistan vs Nepal ACC Under 19 Asia Cup 2024 Live Streaming: अफगाणिस्तान-नेपाळ यांच्यातील सामना कधी, कुठे आणि कसा खेळवला जाईल? घ्या जाणून

दोन्ही संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

Photo Credit- X

Afghanistan National Under-19 Cricket Team vs Nepal National Under-19 Cricket Team ACC U19 Asia Cup 2024 Live Streaming: एसीसी अंडर-19 आशिया कप 2024 चा 10 वा सामना आज अफगाणिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यात होणार (Afghanistan vs Nepal ACC Under 19 Asia Cup 2024) आहे. दोन्ही संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांनी या स्पर्धेत आतापर्यंत विशेष कामगिरी केलेली नाही. अफगाणिस्तानला त्याच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, नेपाळ संघालाही आपल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे नेपाळचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. (हेही वाचा:PV Sindhu Wedding: पीव्ही सिंधू लवकरच अडकणार विवाह बंधनात, 22 डिसेंबरला होणार विवाह सोहळा )

अफगाणिस्तान आणि नेपाळ यांच्यात कधी होणार सामना?

एसीसी अंडर-19 आशिया कप 2024 मध्ये अफगाणिस्तान आणि नेपाळ यांच्यातील 10 वा सामना मंगळवारी 3 डिसेंबर रोजी शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह येथे भारतीय वेळेनुसार, सकाळी 10:30 वाजता खेळवला जाईल. तर नाणेफेक वेळ अर्धा तास आधी असेल.

अफगाणिस्तान आणि नेपाळ यांच्यातील सामना कुठे पाहता येईल?

भारतामध्ये अफगाणिस्तान आणि नेपाळ एसीसी अंडर 19 आशिया कप 2024 चा 10 वा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्क एसडी आणि एचडी आणि सोनी स्पोर्ट्स टेन असडी आणि एचडी चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल. सोनी लाईव्ह ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

दोन्ही संघांचे खेळाडू

नेपाळ अंडर 19 संघ: आकाश त्रिपाठी, माया यादव, अर्जुन कुमल, नरीन भट्टा, संतोष यादव, उत्तम थापा मगर (विकेटकीपर), रोशन बिश्वकर्मा, नरेन सौद, अभिषेक तिवारी, हेमंत धामी (कर्णधार), युवराज खत्री, बिपिन महतो, अपराजित पौडेल, रणजित कुमार, उनेश बिक्रम सिंग

अफगाणिस्तान अंडर 19 संघ: मेहबूब खान (कर्णधार), उझैरुल्ला नियाझाई, फैसल खान अहमदझाई, हमजा खान अलीखिल (विकेटकीपर), बरकत इब्राहिमझाई, एजत बरकझाई, नझीफुल्लाह अमीरी, एएम गझनफर, नसीर खान मारूफखिल, अब्दुल अजीज, नूरिस्तानी उमरझाई, ख़ैरवाली, नुरीस्तानी स्टॅनिकझाई, हाफिज झद्रान, रोहुल्ला, वहीदुल्ला झद्रान