Afghanistan Beat Zimbabwe, 3rd ODI Match Scorecard: अफगाणिस्तानने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा 8 गडी राखून पराभव करत मालिका 2-0 ने जिंकली, सादिकुल्लाह अटलची शानदार खेळी
एएम गझनफरशिवाय राशिद खानने तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी अफगाणिस्तान संघाला 50 षटकात 128 धावा करायच्या होत्या.
Zimbabwe National Cricket Team vs Afghanistan National Cricket Team, 3rd ODI Match 2024 Scorecard Update: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील (ODI Series) तिसरा आणि निर्णायक सामना आज म्हणजेच 21 डिसेंबर रोजी खेळला गेला. उभय संघांमधील हा सामना हरारे (Harare) येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये (Harare Sports Club) झाला. तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तान संघाने झिम्बाब्वेचा आठ गडी राखून पराभव केला. यासह अफगाणिस्तान संघाने मालिका 2-0 अशी खिशात घातली आहे. या मालिकेत झिम्बाब्वेची कमान क्रेग एर्विनच्या (Craig Ervine) हाती होती. तर अफगाणिस्तानचे नेतृत्व हशमतुल्ला शाहिदी (Hashmatullah Shahidi) करत होते. (हेही वाचा - Shreyas Iyer Century: विजय हजारे ट्रॉफीत श्रेयस अय्यरने ठोकले फक्त 51 चेंडूत शतक, कर्नाटकाविरोधात खेळली शानदार खळी)
तत्पूर्वी, तिसऱ्या वनडेत अफगाणिस्तानच्या हशमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या झिम्बाब्वे संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 24 धावा करून संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 30.1 षटकात केवळ 127 धावांवर गारद झाला. झिम्बाब्वेसाठी स्टार फलंदाज शॉन विल्यम्सने सर्वाधिक 60 धावांची खेळी खेळली.
या झंझावाती खेळीदरम्यान शॉन विल्यम्सने अवघ्या 61 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकार ठोकले. शॉन विल्यम्सशिवाय सिकंदर रझाने 13 धावा केल्या. दुसरीकडे, एएम गझनफरने अफगाणिस्तान संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. अफगाणिस्तानसाठी एएम गझनफरने सर्वाधिक 5 बळी घेतले. एएम गझनफरशिवाय राशिद खानने तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी अफगाणिस्तान संघाला 50 षटकात 128 धावा करायच्या होत्या.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 84 धावांची मजल मारली. अफगाणिस्तान संघाने 26.5 षटकात दोन विकेट्स गमावून हा सामना जिंकला. अफगाणिस्तानसाठी सलामीवीर सेदिकुल्लाह अटलने सर्वाधिक 52 धावांची खेळी खेळली.
या शानदार खेळीदरम्यान सादिकुल्लाह अटलने 50 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकार मारले. सेदीकुल्लाह अटलशिवाय सलामीवीर अब्दुल मलिकने 29 धावा केल्या. रिचर्ड नगारवाने झिम्बाब्वे संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. झिम्बाब्वेकडून रिचर्ड नगारवा आणि ट्रेव्हर ग्वांडू यांनी प्रत्येकी सर्वाधिक एक विकेट घेतली.