Cricketer's Retirement: पाच दिवसांमध्ये 5 क्रिकेटपटूंकडून निवृत्तीची घोषणा, ऑगस्ट महिन्यातील पाचही दिवस चर्चेत
याशिवाय इंग्लिश अष्टपैलू खेळाडू मोईन अलीनेही पुन्हा कसोटी क्रिकेटला अलविदा केला.
ऑगस्ट महिना क्रिकेट जगतासाठी अत्यंत वाईट ठरला आहे. या महिन्यात आतापर्यंत 3 क्रिकेटपटूंनी निवृत्ती घेतली आहे. 31 जुलै रोजी इंग्लंडचा महान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने क्रिकेटला अलविदा केला आणि त्याचवेळी फिरकी गोलंदाज मोईन अलीने पुन्हा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. याशिवाय भारत, इंग्लंड आणि नेपाळच्या खेळाडूंनीही क्रिकेटला अलविदा केला. अॅशेस 2023 च्या शेवटच्या कसोटीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने क्रिकेटला अलविदा केला. याशिवाय इंग्लिश अष्टपैलू खेळाडू मोईन अलीनेही पुन्हा कसोटी क्रिकेटला अलविदा केला. ब्रॉडने 847 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेऊन आपल्या कारकिर्दीचा शेवट केला. त्याचवेळी मोईन अलीने 3094 धावा आणि 204 बळी घेत कसोटीला अलविदा केला. (हेही वाचा - IND vs WI 2nd T20 2023: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर, खेळू शकतात गेम चेंजर खेळी)
भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारीने 3 ऑगस्ट रोजी क्रिकेटला अलविदा केला. भारताकडून खेळणारा मनोज तिवारी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळत असे. मनोजने भारतासाठी 12 एकदिवसीय आणि 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तसेच त्याने 141 प्रथम श्रेणी सामने खेळले. 2022 T20 विश्वचषक स्पर्धेत चॅम्पियन इंग्लंडचा महत्त्वाचा भाग असलेल्या अॅलेक्स हेल्सने 4 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. इंग्लंडकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये 156 सामने खेळल्यानंतर हेल्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
नेपाळचा माजी कर्णधार ज्ञानेंद्र मल्ला याने 4 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ज्ञानेंद्र यांनी नेपाळकडून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 37 एकदिवसीय आणि 45 टी-20 सामने खेळले. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 876 धावा आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 883 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 1 शतक आणि 9 अर्धशतकं झळकली. ज्ञानेंद्रने 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.