दिल्ली: महेंद्रसिंग धोनी याच्या घरात चोरी; 3 जण अटकेत

भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी याच्या नोएडा येथील घरात चोरी झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे

MS Dhoni and Sakshi Dhoni (Photo Credit: Twitter)

भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी (MS Dhoni) याच्या नोएडा (Noida) येथील घरात चोरी झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या तिघांकडे एलईडी टीव्ही आणि अन्य सामान सापडले.

पोलिस निरीक्षक राजेश कुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका सूचनेच्या आधारावर पोलिसांनी गुरुवारी राहुल, बाबू उर्फ सहाबुद्दीन आणि इकलाख यांना अटक केली. चोरांकडे तीन इनव्हर्टर, नऊ बॅटऱ्या, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, मोबाईल फोन आणि गॅस सिलेंडर इत्यादी वस्तू सापडल्या. चौकशी दरम्यान चोरांनी हे सामान सेक्टर 104 येथील घरातून मे महिन्यात चोरी केल्याचे कबुल केले. (आम्रपाली ग्रुप विरोधात 'कॅप्टन कूल'ची सर्वोच्च न्यायालयात धाव, 40 कोटी थकवल्याचा आरोप)

हे घर क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी च्या मालकीचे असून ते त्याने विक्रम सिंह नावाच्या व्यक्तीला भाड्याने दिले आहे.