COVID-19: कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अंपायर अलीम डार यांनी लाहोरमध्ये केली विनामूल्य जेवणाची व्यवस्था, हिमा दासकडूनही आसाम सरकारला मदत जाहीर
आंतरराष्ट्रीय अंपायर डार यांचे ‘डार डेलिटो’ नावाचे लाहोरमध्ये एक रेस्टोरंट आहे. दुसरीकडे, भारतीय स्पिरिंटर हिमा दासनेही कोरोना व्हायरसविरुद्ध लढ्यात तिचा एका महिन्याचा पगार देण्याचे वचन दिले आहे.
पाकिस्तानी (Pakistan) अंपायर अलीम डार (Aleem Dar) यांनी सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) उद्रेकात बेरोजगारांना लाहोरमधील त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये मोफत भोजन देण्याची ऑफर दिली आहे. पाकमध्ये आतापर्यंत सुमारे 1200 पुष्टीकरण झालेल्या कोरोनाव्हायरसची नोंद झाली असून 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आंतरराष्ट्रीय अंपायर डार यांचे ‘डार डेलिटो’ नावाचे लाहोरमध्ये एक रेस्टोरंट आहे. डार यांनी जाहीर केले की कोविड-19 (COVID-19) मुळे नोकरी गमावलेले लोकं त्यांच्या रेस्टोरंटमध्ये फ्रीमध्ये जेवण जेवू शकतात. “कोरोनाव्हायरस जगभर पसरला आहे आणि त्याचे परिणाम आता पाकिस्तानातही दिसू लागले आहेत,” डार यांनी एका व्हिडिओ मेसेजमध्ये सांगितले. "तथापि, आमच्या पाठिंब्याशिवाय आमचे सरकार यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. मी सर्व लोकांना सरकारच्या निर्देशानुसार सूचना पाळण्याची विनंती करतो." पाकिस्तानचे माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदी यांनीही देशातील गरजूंना जंतुनाशक साबण, साहित्य आणि भोजन दान करत आपल्या परीने मदतीसाठी पुढाकार घेतला. (Coronavirus Outbreak: एमएस धोनी याची पुण्यात रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांना लाख रुपयांची मदत)
दुसरीकडे, भारतीय स्पिरिंटर हिमा दासनेही (Hima Das) कोरोना व्हायरसविरुद्ध लढ्यात तिचा एका महिन्याचा पगार देण्याचे वचन दिले आहे. दास आपला पगार आसाम सरकारच्या कोविड-19 च्या मदत निधीमध्ये देणार आहे. "मित्रांनो, एकत्र उभे राहण्याची आणि ज्यांना आमची गरज आहे त्यांचे समर्थन करण्याची वेळ आली आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी केलेल्या आसाम आरोग्य निधी खात्यात मी माझ्या एका महिन्याच्या पगाराचा हातभार लावत आहे, असे हिमाने ट्विट करून म्हटले. हिमाच्या घोषणेबद्दल किरेन रिजीजू यांनी तिच्या प्रयत्नांचे कौतुक केले. "महान जेस्चर, हिमा दास. आपल्या मेहनतीने मिळवलेल्या एका महिन्याच्या पगाराचा अर्थ खूपच अर्थपूर्ण असेल! भारत कोरोनाशी लढा देत आहे, ”असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
भारतीय शटलर पीव्ही सिंधूने कोरोना व्हायरसविरुद्ध लढ्यात 10 लाख रुपयांची देणगीही दिली आहे. सिंधू यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्री मदत निधीसाठी प्रत्येकी 5 लाख रुपयांची देणगी दिली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भाव झाल्याने जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धा थांबवण्यात आल्या आहेत. जगभरातील अनेक स्टार्सजे गरजू आणि गरिबांना मदत करण्याची ऑफर दिली आहे. क्रिकेटर्स आणि इतर प्रसिद्ध व्यक्ती त्यांच्या देशातील गरीब लोकांना मोठ्या प्रमाणात पैसे आणि अन्नदान करण्याचा प्रयत्न केला आहे.