IPL 2021: राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात 2 धावांनी हरल्याने कर्णधार के एल राहुल नाराज, दिली 'अशी' प्रतिक्रिया
चांगल्या स्थितीत असूनही हा पराभव पचवणे खूप कठीण आहे. पंजाबच्या संघाला शेवटच्या षटकात फक्त चार धावांची गरज होती आणि त्याच्या हातात आठ विकेट्स होत्या. पंजाब किंग्सने शेवटच्या षटकात दोन विकेट गमावल्या एवढेच नाही तर संघाला फक्त एक धाव मिळवता आली.
मंगळवारी राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध खेळलेल्या सामन्यात पंजाब किंग्सला (PBKS) दोन धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल (Captain KL Rahul) संघाच्या पराभवामुळे खूप निराश झाला आहे. राहुल म्हणाला की, चांगल्या स्थितीत असूनही हा पराभव पचवणे खूप कठीण आहे. पंजाबच्या संघाला शेवटच्या षटकात फक्त चार धावांची गरज होती आणि त्याच्या हातात आठ विकेट्स होत्या. पंजाब किंग्सने (Punjab Kings) शेवटच्या षटकात दोन विकेट गमावल्या एवढेच नाही तर संघाला फक्त एक धाव मिळवता आली. राहुलचा असा विश्वास आहे की संघाने मागील चुकांमधून धडा घेतला नाही. यासह राहुल म्हणाला की संघाने दबावाखाली अधिक चांगले करणे आवश्यक आहे. कर्णधार राहुल म्हणाला, हा पराभव पचवणे कठीण आहे. आपल्याला दबावाला अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जावे लागेल. हा पराभव पचवणे कठीण आहे कारण आपण आपल्या मागील चुकांमधून धडा घेतलेला नाही.