Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिकवर कोरोनाचे सावट; पदक जिंकलेला ब्रिटीश स्विमर कोविड पॉझिटिव्ह
एका खेळाडूला पदक जिंकल्यानंतर कोविड -19 ची लागण झाल्याचे आढळले आहे.
Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिकवर कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत एक ब्रिटीश स्विमीर कोरोना पॉझिटीव्ह (Adam Peaty Covid) झाल्याचे समोर आले आहे. आज ऑलिम्पिकचा चौथा दिवस आहे. मात्र, कालच सोमवारी, ब्रिटीश जलतरणपटू ॲडम पीटी याला कोविड -19 ची लागण झाल्याचं आढळलं. विशेष म्हणजे, कोविडची लागण होण्यापूर्वी पीटीनं पुरुषांच्या 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्य पदक जिंकलं आहे. सामन्यादरम्यानच त्याला अस्वस्थ वाटत होतं. (हेही वाचा:Manika Batra Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनिका बत्रानं रचला इतिहास, राउंड ऑफ 16 मध्ये प्रवेश करणारी ठरली पहिली भारतीय टेबल टेनिसपटू )
ॲडम पीटी कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतर ब्रिटीश टीमनं एक निवेदन जारी केलं. पीटीची कोविड चाचणी सोमवारी करण्यात आली आणि तो पॉझिटिव्ह आढळला. असं त्यात लिहिलं गेलं. याच्या एक दिवस आधी अस्वस्थ वाटत असतानाही त्यानं 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. रविवारी पुरुषांच्या 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोकच्या अंतिम फेरीपूर्वी ॲडम पीटीला अस्वस्थ वाटू लागलं. अंतिम फेरीच्या काही तासांनंतर त्याची लक्षणं आणखीन वाढली. यानंतर सोमवारी सकाळी त्याची कोविड चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली. (हेही वाचा:Badminton At Paris Olympics 2024: लक्ष्य सेनने दुसऱ्या गटातील लढतीत बेल्जियमच्या ज्युलियन कॅरागीचा 21-19, 21-14 ने केला पराभव )
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रविवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात ॲडम पीटी इटलीच्या निकोलो मार्टिनेघी याच्या पेक्षा 0.02 सेकंदांनी मागे राहिला. त्यामुळे पीटीला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. सामन्यादरम्यान त्याला पाहून तो आजारी असल्याचं अजिबात वाटत नव्हतं. पीटी दोन वेळचा 100 मीटर स्विमिंग चॅम्पियन देखील आहे.
पोस्ट पहा
कोव्हिड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर प्रतिक्रिया देताना पीटी म्हणाला, “हे अजिबात निमित्त नाही, कारण मला बिलकूल वाटत नाही की हे निमित्त व्हावं. मात्र हा एक असा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर मला द्यावं लागेल”. सामना संपल्यानंतर पीटीला घसादुखीमुळे बोलण्यात त्रास होत होता.