IPL Auction 2025 Live

Team India Salary: BCCI कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या पगारात करणार वाढ, बोनसही देणार!

2016 मध्ये कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंचा पगार दुप्पट केला होता

Team India (Photo Credit - X)

भारतीय संघातील (Team India) अनेक खेळाडूंनी कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवली आहे. कसोटी क्रिकेट (Test Cricket) आणि देशांतर्गत क्रिकेट न खेळता काही खेळाडूंचा आयपीएलवर (IPL 2024) खेळण्याला प्राधान्य देतात. कसोटी क्रिकेटला (Test Cricket)  प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआय (BCCI) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या पगारात वाढ करण्याबाबात बीसीसीआय विचार करत आहे. कसोटी मालिकेचा भाग असणाऱ्या खेळाडूंना बोनसही दिला जाऊ शकतो. (हेही वाचा - IND Beat ENG 4th Test: शुभमन गिल आणि ध्रुव जुरेलच्या शानदार खेळीने भारताचा चौथ्या कसोटीत इंग्लंडवर 5 विकेटने विजय, मालिकेत 3-1 ने आघाडी)

आयपीएल 2024 नंतर बीसीसीआय कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या पगारात वाढ करु शकते. त्याशिवाय कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंना बोनसही दिला जाऊ शकतो. अनेक खेळाडू तंदुरुस्त राहण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवत आहेत, त्यामुळे बीसीसीआय हा निर्णय घेणार आहे. नुकताच ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या स्टार खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला.  यानंतर मोठा वाद झाला होता.

बीसीसीआकडून एका कसोटी सामन्यासाठी खेळाडूंना 15 लाख रुपये दिले जातात. 2016 मध्ये कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंचा पगार दुप्पट केला होता. दुसरीकडे बीसीसीआयकडून एका वनडे सामन्यासाठी सहा लाख रुपये दिले जातात. तर एका टी 20 सामन्यासाठी 3 लाख रुपयांचं मानधन दिलं जातं. भारतीय खेळाडूंना ग्रेडनुसार वार्षिक पगारही दिला जातो.