Ambati Rayudu: अंबाती रायुडू आणि पत्नी चेन्नूपल्ली विद्या यांना कन्यारत्न; CSK, सुरेश रैना यांनी दिल्या शुभेच्छा
अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू आणि त्याची पत्नी चेन्नूपल्ली विद्या यांनी कन्यारत्नाची प्राप्ती झाली. अंबाती आणि त्याची महाविद्यालयीन प्रेमिका चेन्नूपल्ली विद्या यांनी 2009 मध्ये लग्न केले. त्याची आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्ज यांनी रायुडू कुटूंबाचा एक मनमोहक सेल्फी पोस्ट केला.
अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू (Ambati Rayudu) आणि त्याची पत्नी चेन्नूपल्ली विद्या यांनी कन्यारत्नाची प्राप्ती झाली. अंबाती आणि त्याची महाविद्यालयीन प्रेमिका चेन्नूपल्ली विद्या यांनी 2009 मध्ये लग्न केले. त्याची आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kins) यांनी रायुडू कुटूंबाचा एक मनमोहक सेल्फी पोस्ट केला आणि अधिकृत ट्विटर हँडलवर या वृत्ताला दुजोरा दिला. र्यूड नेही त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली. चेन्नई सुपर किंग्जच्या पोस्टवर यूजर्स आणि खेळाड असे सर्वत्र अभिनंदन संदेश येत आहेत. भारतीय स्टार आणि अंबाती रायुडूचा आयपीएलचा सहकारी सुरेश रैना (Suresh Raina) याने देखील नवीन पालकांचे अभिनंदन केले आणि त्याने ट्विट करत लिहिले,“आपल्या मुलीच्या जन्माबद्दल अंबाती रायुडू व विद्या यांचे मनःपूर्वक अभिनंदन. लहान मुलीसोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि तुम्हा सर्वांना खूप प्रेम आणि आनंदी शुभेच्छा!” (मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपर किंग्स? अंबाती रायुडू याने निवडली आवडती IPL फ्रॅन्चायसी)
दरम्यान, रायुडूची क्रिकेट कारकीर्द गेल्या एक वर्षात रोलरकोस्टरमधून गेली आहे. 2019 च्या सुरूवातीस तो भारतीय संघाचा अविभाज्य भाग होता आणि विश्वचषक स्पर्धेत भारताच्या संघात स्थान मिळविण्याच्या तयारीत होता. तथापि, ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मालिकेत तो छाप पाडण्यात अपयशी ठरल्यानंतर गोष्टी बदलल्या. निवड समितीने विजय शंकरची निवड केली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला.
CSKचे ट्विट
सुरेश रैना
दुखापतीची बदली म्हणून रिषभ पंत आणि मयंक अग्रवालच्या विश्वचषक संघात समावेश झाल्यावर रायुडूने निवृत्तीची घोषणा केली. त्याने मात्र काही महिन्यांनंतर आपला निर्णय पलटविला आणि विजय हजारे व सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत हैदराबादचे नेतृत्व केले. मात्र, संघ-निवडीतील राजकारणामुळे रणजी ट्रॉफीतील मागील आवृत्तीतून त्याने माघार घेतली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)