Vietnam Student Dies From Bird Flu : बर्ड फ्लू माणसात पसरतोय?, व्हिएतनाममध्ये विद्यार्थ्याचा H5N1 इन्फ्लूएंझा व्हायरस संसर्गाने मृत्यू
H5N1 या संसर्गामुळे मानवाचा मृत्यू होऊ शकतो असे एका घटनेतून समोर आले आहे. न्हा ट्रांग विद्यापीठातील 21 वर्षीय विद्यार्थ्याचा एच 5 इन्फ्लूएंझा विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाल्यानंतर ही बाब समोर आली आहे.
Vietnam Student Dies From Bird Flu : व्हिएतनाममध्ये एका २१ वर्षीय विद्यार्थ्याचा H5N1 या बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे मृत्यू (Student Die)झाला आहे. मंगळवारी २६ मार्च रोजी व्हिएतनामच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबतची पुष्टी केली. न्हा ट्रांग विद्यापीठातील हा विद्यार्थी होता. विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे बर्ड फ्लूच्या (Bird Flu)संसर्गामुळे मानवाचा मृत्यू होऊ शकतो असे समोर आले आहे. आतापर्यंत व्हिएतनाममधील सहा प्रांत आणि शहरांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.(हेही वाचा :First Avian Bird Flu Case in Antarctica: अंटार्क्टिकामध्ये एव्हियन बर्ड फ्लूच्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी; शास्त्रज्ञांनी व्यक्त केली 'पर्यावरणीय आपत्ती'ची भीती )
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)