Viral Video: सौदी एअरलाइन्सच्या विमानाला आग, पेशावरमध्ये इमर्जन्सी लँडिंग, पाहा व्हिडीओ

पाकिस्तानमधील पेशावर विमानतळावर बुधवारी सौदी अरेबियाच्या प्रवासी विमानाला आग लागली. विमान उतरल्यानंतर लगेचच आगीची घटना घडली आणि सर्व प्रवासी आणि केबिन क्रूला सुखरूप बाहेर काढण्यात आले. सौदी एअरलाइन्सचे विमान 792 पेशावर विमानतळावर उतरले तेव्हा त्यातून धूर निघताना दिसला.

Viral Video: सौदी एअरलाइन्सच्या विमानाला आग, पेशावरमध्ये इमर्जन्सी लँडिंग, पाहा व्हिडीओ
VIDEO: Saudi Airlines plane catches fire, emergency landing in Peshawar, see in video how people are jumping from the plane

Viral Video: पाकिस्तानमधील पेशावर विमानतळावर बुधवारी सौदी अरेबियाच्या प्रवासी विमानाला आग लागली. विमान उतरल्यानंतर लगेचच आगीची घटना घडली आणि सर्व प्रवासी आणि केबिन क्रूला सुखरूप बाहेर काढण्यात आले. सौदी एअरलाइन्सचे विमान 792 पेशावर विमानतळावर उतरले तेव्हा त्यातून धूर निघताना दिसला. काही वेळातच हवाई वाहतूक नियंत्रकाने वैमानिकाला माहिती दिली. तसेच अग्निशमन व बचाव सेवेलाही याबाबत माहिती देण्यात आली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग तातडीने विझवण्यात आली. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

पाहा पोस्ट:

हे विमान सौदी अरेबियातील रियाध येथून पेशावरला आले होते. या विमानात 275 प्रवासी आणि 21 केबिन क्रू मेंबर होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ही घटना खूपच भीतीदायक होती, मात्र दक्षता आणि तत्काळ कारवाईमुळे सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement