US: टोमॅटोचा मोठा भार घेऊन जाणारा ट्रक महामार्गावर उलटल्याने सात कार अपघात (Watch Video)
150,000 हून अधिक टोमॅटो ट्रकमधून बाहेर पडल्यानंतर यूएस मोटरवेवर सात कार अपघात झाले.
टोमॅटोचा मोठा भार घेऊन जाणारा ट्रक सोमवारी पहाटे अमेरिकेमधील उत्तर कॅलिफोर्नियामधील सोलानो काउंटीमधील व्हॅकाव्हिलजवळ उलटला. यामुळे 150,000 हून अधिक टोमॅटो ट्रकमधून बाहेर पडल्यानंतर यूएस मोटरवेवर सात कार अपघात झाले. तसेच यामुळे सॅक्रामेंटोला जाण्याचा प्रयत्न करणार्या बे एरियातील प्रवाशांची वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातामध्ये कोणतीही दुखापत झाली नाही, परंतु प्रवाशांनी ट्राफिकची तक्रार केली आणि त्यांना राज्याच्या कॅपिटलकडे पर्यायी मार्ग शोधण्यास भाग पाडले गेले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)