Drug Bust in Peru: पेरू पोलिसांचा अनोखा मिशन, कोट्यावधी अमली पदार्थासह आरोपींना अटक
पेरू पोलिस अधिकाऱ्यांने टेडी बिअरच्या वेशात जाऊन परिसरात छापा टाकला आहे.
Drug Bust in Peru: व्हेलंटाइनच्या दिवशी पेरू पोलिसांनी एक अनोखा मिशन करत अमली पदार्थ विकणाऱ्यांना अटक केले आहे. पेरू पोलिस अधिकाऱ्यांने टेडी बिअरच्या वेशात जाऊन परिसरात छापा टाकला आहे. देशाची राजधानी लिमा येथे ही घटना घडली आहे. या घटनेचा संपुर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एका टेडीबिअरने परिसरात गुडघ्यावर बसून गिफ्ट देण्याच्या बहाणे बसतो. हे पाहून एक महिला खाली उतरते आणि हे पाहून एक संशयित आरोपी तिला रोखण्यासाठी जवळ जातो. परंतु तो पर्यंत पोलिस ( टेडी बिअरच्या वेशात) संशयित आरोपीला पकडतो. अटक केल्यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन जातो. पोलिस ठाण्यात आरोपी महिलेला या सर्व गोष्टी अनावर झाले. टेडी बिअरच्या वेशात असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्यांने महिलेचे सात्वन केल्याचे व्हिडिओ दिसत आहे. पोलिसांनी आरोपींकडून कोकिन, हेरोईन असे अनेक आमली पदार्थाचे साठे जप्त केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)