Twitter Blocked in Pakistan: सार्वत्रिक निवडणुकांमध्ये झालेल्या हेराफेरीच्या विरोधात देशव्यापी निषेधाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये ट्विटर ब्लॉक
पाकिस्तानमधील तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कथित हेराफेरी आणि त्यांच्या जनादेशाच्या चोरीविरोधात देशव्यापी निदर्शने सुरू केली आहेत.
Twitter Blocked in Pakistan: सार्वत्रिक निवडणुकांमध्ये झालेल्या हेराफेरीच्या विरोधात देशव्यापी निषेधाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये (Pakistan) ट्विटर ब्लॉक (Twitter Blocked) करण्यात आले आहे. पाकिस्तानमधील तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कथित हेराफेरी आणि त्यांच्या जनादेशाच्या चोरीविरोधात देशव्यापी निदर्शने सुरू केली आहेत. राजधानी इस्लामाबादमध्ये झालेल्या निदर्शनांमुळे अधिकाऱ्यांनी शनिवारी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने निवडणूक निकालांवर टीका केली आणि कथित हेराफेरीच्या विरोधात देशव्यापी 'शांततापूर्ण निषेध' जाहीर केले. पीटीआय-समर्थित अपक्ष उमेदवारांनी 90 पेक्षा जास्त नॅशनल असेंब्लीच्या जागा जिंकून निवडणूक निकालांमध्ये आपले वर्चस्व कायम राखले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)