Tiny Robot Kidnaps 12 Big Bots: काय सांगता? चीनमध्ये एका छोट्या रोबोटने केले 12 मोठ्या रोबोंचे 'अपहरण'; व्हिडिओ व्हायरल (Watch)

हा रोबो त्यांना आपली कामाची ठिकाणे सोडून शोरूमच्या बाहेर जाण्यास प्रवृत्त करत आहे.

Tiny Robot Kidnaps 12 Big Bots

Tiny Robot Kidnaps 12 Big Bots:  चीनमधून एका लहान रोबोटने इतर 12 मोठ्या रोबोंचे यशस्वीरित्या ‘अपहरण’ केल्याची विचित्र घटना समोर आली आहे. हांगझू येथील एका लहान, एआयसमर्थित रोबोटने शांघाय रोबोटिक्स कंपनीच्या शोरूममधून 12 मोठ्या रोबोटचे अपहरण केले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. फुटेजमध्ये एरबाई नावाचा लहान रोबो मोठ्या रोबोट्सशी संभाषण करताना दिसत आहे. हा रोबो त्यांना आपली कामाची ठिकाणे सोडून शोरूमच्या बाहेर जाण्यास प्रवृत्त करत आहे. एरबाईच्या आदेशांच्या प्रभावाखाली असलेले रोबोट्स आज्ञाधारकपणे त्याचे पालन करतात आणि त्याच्यासोबत निघून जातात.  सुरुवातीला हा व्हिडिओ विनोदी फसवणूक म्हणून फेटाळण्यात आला. मात्र, नंतर  शांघाय कंपनी आणि हँगझोउ उत्पादक या दोघांनीही घटनेच्या सत्यतेची पुष्टी केली. एरबाईने मोठ्या यंत्रमानवांच्या सिस्टीममधील सुरक्षा असुरक्षिततेचा गैरफायदा घेतला होता, ज्यामुळे तो त्यांच्या कृतींवर नियंत्रण मिळवू शकला. (हेही वाचा: Protect Mobile From Explosion: ओवर चार्जिंगमुळे मोबाईल स्फोटांच्या घटनांमध्ये वाढ; कसे कराल तुमच्या मोबाईलचे संरक्षण? जाणून घ्या टिप्स)

एका छोट्या रोबोटने केले 12 मोठ्या रोबोंचे 'अपहरण'-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)