Mia Khalifa Lost Job: इस्रायल-हमास युद्धात पॅलेस्टाईनला पाठिंबा देणं मिया खलिफाला पडलं महागात; CEO ने टाकलं नोकरीवरून काढून

मियाने ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'तुम्ही पॅलेस्टाईनमधील परिस्थितीकडे पाहत असाल आणि पॅलेस्टिनींच्या बाजूने नसाल तर तुम्ही भेदभाव करत आहात, आणि इतिहास हे काळानुसार दाखवेल.' मियाच्या या ट्विटने रेड लाइट हॉलंडचे सीईओ टॉड शापिरो यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Mia Khalifa (फोटो सौजन्य - Instagram)

Mia Khalifa Lost Job: इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष वाढत असताना हमासने इस्रायलवर हल्ले सुरू केल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अशातचं आता अॅडल्ट स्टार मिया खलिफाने पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवला. मियाने ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'तुम्ही पॅलेस्टाईनमधील परिस्थितीकडे पाहत असाल आणि पॅलेस्टिनींच्या बाजूने नसाल तर तुम्ही भेदभाव करत आहात, आणि इतिहास हे काळानुसार दाखवेल.' मियाच्या या ट्विटने रेड लाइट हॉलंडचे सीईओ टॉड शापिरो यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांची कंपनी यूएस आणि युरोपमध्ये मशरूम होम ग्रोथ किट्सचे उत्पादन आणि विक्री करते. या वर्षाच्या सुरुवातीला, मियाला या कंपनीत नोकरी मिळाली होती. ती या कंपनीचा ऑनलाइन व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करणार होती. मात्र, आता कंपनीच्या CEO ने जाहीरपणे मिया खलिफाला नोकरीवरून काढून टाकलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement