Snake Found in AI Express Plane's Cargo: एअर इंडिया एक्स्प्रेसच्या कार्गो होल्ड विमानामध्ये सापडला साप; दुबई विमानतळावर निर्देशनास आला प्रकार

विमान वाहतूक नियामक DGCA या घटनेची चौकशी करत आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. B737-800 विमान कालिकत, केरळ येथून आले होते. या विमानातून प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Instagram)

Snake Found in AI Express Plane's Cargo: एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान शनिवारी दुबई विमानतळावर उतरल्यानंतर कार्गो होल्डमध्ये साप आढळून आला. विमान वाहतूक नियामक DGCA या घटनेची चौकशी करत आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. B737-800 विमान कालिकत, केरळ येथून आले होते. या विमानातून प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दुबई विमानतळावर विमानाच्या कार्गो होल्डमध्ये एक साप आढळून आला आणि विमानतळ अग्निशमन सेवांनाही याची माहिती देण्यात आली. घटनेची चौकशी केली जाईल आणि योग्य अंमलबजावणी कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now